Twitter नेत्यांना विशेष टॅग देणार, मस्क यांची घोषणा; बायडन यांना मिळाला, पीएम मोदींना कधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 10:50 AM2022-11-02T10:50:51+5:302022-11-02T11:12:50+5:30
सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ट्विटर आता टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांच्या ताब्यात गेले आहे. मस्क यांनी ट्विटरमध्ये आता मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.
सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) आता टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांच्या ताब्यात गेले आहे. मस्क यांनी ट्विटरमध्ये आता मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. तर ब्लू टिक वापरणाऱ्या वापरकर्त्यांना महिन्याला पैसे आकारण्याचा निर्णय घेतला. आता ट्विटर नेत्यांना आणि सेलिब्रिटींना सेकंडरी टॅग देणार असल्याची घोषणा इलॉन मस्क यांनी केली.
मस्क (Elon Musk) यांनी ज्या सेकंडरी टॅगची घोषणा केली, तो टॅग अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांना देण्यात आला आहे. बायडन यांच्या नावाखाली United States Government Official असा सेकंडरी टॅग आहे. पण, हा टॅग भारतातील नेत्यांना अजुनही देण्यात आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) किंवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावासमोर असा सेकंडरी टॅग दिसत नाही. पण, आता ट्विटरला ब्लू टिक चार्ज दिल्यानंतर त्यात बदल दिसतील.
ट्विटरवर ब्लू टिक हवीये? महिन्याला भरा इतके पैसे, मस्क यांची मोठी घोषणा
एखाद्या देशाशी संबंधित ट्विटर खात्यांना सेकंडरी टॅगद्वारे त्या अकाउंटबद्दल अधिक माहिती मिळणार आहे. हे टॅग सरकारचे काही अधिकृत प्रतिनिधी, राज्य-संलग्न मीडिया संस्था आणि त्या संस्थांशी संबंधित व्यक्तींना दिले जाणार आहे. हे लेबल संबंधित ट्विटर (Twitter) खात्याच्या प्रोफाइल पेजवर दिसते. टॅगमध्ये त्या संबंधित खात्याची माहिती मिळणार आहे.
देशाच्या त्या वरिष्ठ अधिकारी आणि संस्थांना सेकंडरी टॅग दिला जाईल, जो देशाचा अधिकृत नेता असेल त्यांना मिळेल. हा टॅग देशाचे राज्य प्रमुख, परराष्ट्र मंत्री, संस्थात्मक संस्था, राजदूत, अधिकृत प्रवक्ते, संरक्षण अधिकारी आणि प्रमुख राजनयिक नेत्यांसह प्रमुख सरकारी अधिकारी यांना दिला जाईल.
माध्यम संस्थांना देखील हा टॅग दिला जाणार आहे. तसेच माध्यमातील मुख्य संपादक किंवा त्यांचे प्रमुख कर्मचारी यांनाही सेकंडरी टॅग दिला जाईल.
या देशांना दिले सेकंडरी टॅग
सेकंडरी टॅग चीन, फ्रान्स, रशिया, यूएसए, यूके, बेलारूस, कॅनडा, जर्मनी, इटली, जपान, क्युबा, इक्वेडोर, इजिप्त, इंडोनेशिया, इराण, सर्बिया, सौदी अरेबिया, तुर्की, थायलंडसह सर्व देशांमध्ये सेकंडरी टॅग देण्यात आले आहेत. यामध्ये भारताचा अद्याप समावेश झालेला नाही. पण, भविष्यात आणखी देशांचा समावेश करण्यात येईल, असे ट्विटरने म्हटले आहे.
आणखी एकाचा राजीनामा
टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी ट्विटर अधिग्रहण करार पूर्ण केल्यानंतर आणि मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचा ताबा घेतल्यानंतर काही तासांनी आपण पद सोडलं असल्याची माहिती ट्विटरच्या जाहिरात प्रमुख सारा पर्सनेट यांनी मंगळवारी सांगितलं. परंतु त्यांनी आपल्या राजीनाम्याचं कारण मात्र सांगितलं नाही.