विजया गड्डेंवरून मस्क अडचणीत? 1 अब्ज डॉलर्सचा दंड होणार; ते ट्विट भोवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 04:44 PM2022-04-28T16:44:31+5:302022-04-28T16:44:39+5:30
Elon Musk यांचा Twitter सोबत ठरलेला सौदा मस्क यांच्या ट्विट्समुळे धोक्यात येऊ शकतो. हा सौदा रद्द झाल्यास इलॉन मस्क यांना दंड भरावा लागेल.
Elon Musk यांनी Twitter यांच्यातील सौदा अजून पूर्णत्वास गेलेला नाही. सध्या हे कॉन्टॅक्ट लॉक्ड आहे आणि पूर्ण होण्यास काही महिने जाऊ शकतात. परंतु आता हा करार इलॉन मस्क यांच्या ट्विट्समुळे रद्द होऊ शकतो आणि त्याचा मोठा फटका टेस्लाच्या सीईओना बसू शकतो. विशेष म्हणजे इलॉन मस्क यांनी याआधी देखील अशीच एक कंपनी विकत घेण्याचा करार रद्द केला होता.
काय आहे प्रकरण
इलॉन मस्क आणि ट्विटर यांच्यात झालेल्या कराराचे काही नियम ठरवण्यात आले आहेत. या नियमांमुळे मस्क यांच्यावर काही बंधन घालण्यात आली आहेत. त्यानुसार टेस्लाचे सीईओ या मर्जर बाबत ट्विट करू शकतात. परंतु ट्विटरच्या प्रतिनिधीची मस्करी करू शकत नाहीत. परंतु नेमकी हीच चूक मस्क यांनी आपल्या 26 एप्रिलच्या ट्विटमधून केली आहे.
इलॉन यांनी Vijaya Gadde या ट्विटरच्या टॉप अॅडव्होकेटना लक्ष्य केलं आहे. ट्विटर मस्क यांच्या हातात जात असल्यामुळे लीगल आणि पॉलिसीच्या टीमच्या मिटिंगमध्ये विजया गड्डे रडू लागल्या. तेव्हा इलॉन यांनी त्यांच्या जुन्या निर्णयांची आठवण करून दिली. त्यांनी सस्पेंड केलेल्या न्यूज वेबसाईटची आठवण ट्विटमधून करून दिली आहे.
ट्विट न करण्याच्या अॅग्रीमेंटवर सही करून देखील मस्क यांना मोह आवरला नाही. याचा याचा परिणाम त्यांच्या कॉन्ट्रॅक्टवर होऊ शकतो. यूएस सिक्योरिटी एक्सचेंजने ठरवून दिलेल्या नियमांच भंग झाल्यामुळे मस्क याना 1 बिलियन डॉलरचा दंड भरावा लागेल.
याआधी देखील केली आहे चूक
न्यूज एजन्सी रॉयटर्सनुसार, चार वर्षांपूर्वी देखील मस्क यांनी अशी चूक केली आहे. त्यांनी See’s Candies ला टक्कर देण्यासाठी कँडी कंपनी उघडण्याची घोषणा केली होती. परंतु नंतर त्यांनी यातून माघार घेतली होती. अशाप्रकारे ट्विटरचा सौदा देखील ते रद्द करू शकतात, अशी शंका व्यक्त केली जात आहे.