Twitter Elon Musk: ट्विटर हटवणार तुमच्या अकाऊंटवरची Blue Tick , एलॉन मस्क यांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 05:01 PM2023-02-11T17:01:45+5:302023-02-11T17:02:25+5:30

तुमची जुनी 'ब्लू टिक' यापुढे राहणार नाही, याचं कारणही मस्कने सांगितलं आहे.

Elon Musk declares that Twitter will remove blue tick from old accounts which were legacy ticks by verification what next then read details | Twitter Elon Musk: ट्विटर हटवणार तुमच्या अकाऊंटवरची Blue Tick , एलॉन मस्क यांनी केली घोषणा

Twitter Elon Musk: ट्विटर हटवणार तुमच्या अकाऊंटवरची Blue Tick , एलॉन मस्क यांनी केली घोषणा

googlenewsNext

Twitter Elon Musk Blue Tick : तुम्ही ट्विटरचे आधीपासूनच व्हेरिफाईड यूजर असाल आणि तुमच्या अकाऊंटवर ब्लू टिक असेल तर तुमचा हा आनंद जास्त काळ टिकणार नाही. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे नवीन बॉस एलॉन मस्क यांनी काही गोष्टी सूचित केल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, लीगेसी ब्लू टिक म्हणजेच ज्यांच्या प्रोफाइलवर आधीपासून ब्लू टिक आहे, त्यांच्या ब्ल्यू टिक लवकरच हटवल्या जाणार आहेत. मस्कच्या आगमनापूर्वी, ट्विटर सेलिब्रिटी, राजकारणी, पत्रकार इत्यादींच्या खात्यांची पडताळणी केली जायची आणि व्हेरियफेकेशन करून ब्ल्यू टिक दिली जायची. मात्र, आता सरसकट कोणीही या ब्ल्यू टिकचा वापर करू शकत नाही. युजर्सना पेड सबस्क्रिप्शनद्वारे या सुविधेचा लाभ घेता येऊ शकेल.

जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांनी ट्विटर ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शन सुरू केले आहे. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पडताळणीनंतर यूजर्सना प्रोफाइलवर निळा चेकमार्क मिळतो. यापूर्वी केवळ सेलिब्रिटी आणि निवडक वापरकर्त्यांना ब्लू टिक्स मिळत असत. अशा परिस्थितीत, मस्कच्या सिग्नलनंतर, पेड सबस्क्रिप्शनशिवाय वापरकर्त्यांसाठी ब्लू टिक गायब होण्याचा धोका वाढला आहे.

जुन्या पद्धतीचा ब्लू टिक फायद्याचा नसणार!

मस्कला टॅग करताना एका ट्विटर युजरने लिहिले की, “प्रिय एलोन मस्क ब्लू व्हेरिफिकेशन मार्क आता विनोद बनला आहे. पूर्वी ब्लू टिक व्हेरिफिकेशन फक्त सार्वजनिक व्यक्ती आणि राजकीय व्यक्तींना दिले जायचे पण आज टॉम, डिक आणि हॅरी (कुणीही) यांची पडताळणी केली जाते. तुमच्या पडताळणी टिकने त्याचे आकर्षण गमावले आहे. यावर ट्विटरच्या बॉसने उत्तर दिले, "लेगसी ब्लू चेक लवकरच काढले जातील कारण तेच खरे बनावट आहेत."

स्वत: मस्ककडे आहे जुनी 'ब्ल्यू टिक'

वापरकर्ते मस्कला उत्तर देण्यासाठी तयार होते. एका वापरकर्त्याने विचारले की मस्क. तु्म्ही कसे ठरवणार की कोण भ्रष्ट आहे? दुसर्‍या वापरकर्त्याने निदर्शनास आणले की मस्क यांच्याच अकाऊंटला जुनी ब्ल्यू टिक आहे. जर सर्वच ब्ल्यू टिक काढून टाकल्या तर गंभीर सुरक्षा धोके निर्माण होऊ शकतात. एका वापरकर्त्याने सुचवले, "लेगसी खात्यांमध्ये वेगवेगळ्या रंगीत टिक्स असायला हव्यात."

दरम्यान, भारतीय वापरकर्त्यांना यासाठी शुल्क मोजावे लागणार आहे. काही वापरकर्ते यात एलॉन मस्कच्या निर्णयाला पाठिंबा देताना दिसले. एका वापरकर्त्याच्या म्हणण्यानुसार, “व्हेरिफिकेशन बॅच केवळ वापरकर्ते असल्याचा दावा करतात याची पुष्टी करण्यासाठी आहे. मला ते आधी आवडले नाही, पण आता निदान चेकमार्क बघून मला कळेल की मी खऱ्या युजरशी बोलत आहे की खोट्या.." Twitter ब्ल्यू भारतात वेबसाठी ६५० रुपये/महिना आणि Android/iOSसाठी ९००/महिना अशा शुल्कासह उपलब्ध असणार आहे.

Web Title: Elon Musk declares that Twitter will remove blue tick from old accounts which were legacy ticks by verification what next then read details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.