एलन मस्कनी भारतासमोर गुडघे टेकले; स्टारलिंकसाठी सर्व अटी केल्या मान्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:12 IST2025-01-29T15:12:31+5:302025-01-29T15:12:53+5:30

मस्क यांच्या स्टारलिंक लाँच करण्यासाठी भारत सरकारने कोणतीही सूट दिलेली नाहीय. सरकारच्या सर्व अटी आपल्याला मान्य असल्याचे पत्र मस्क यांच्या स्टारलिंकने केंद्राकडे सुपूर्द केले आहे.

Elon Musk kneels before India; All conditions for Starlink agreed... | एलन मस्कनी भारतासमोर गुडघे टेकले; स्टारलिंकसाठी सर्व अटी केल्या मान्य...

एलन मस्कनी भारतासमोर गुडघे टेकले; स्टारलिंकसाठी सर्व अटी केल्या मान्य...

अब्जाधीश एलन मस्क हे भारतात गेल्या काही वर्षांपासून स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवा लाँच करण्याच्या प्रतिक्षेत आहेत. भारत सरकारने गेल्या काही काळापासून परदेशी कंपन्यांना त्यांची उत्पादने भारतातच तयार करण्याचा व टेक कंपन्यांना त्यांचे सर्व्हर भारतात ठेवण्याचा तसेच माहिती शेअर करण्याच्या अटी घातल्या होत्या. याशिवाय परवानगीच मिळणार नाही, अशी भूमिका घेतली होती. याला मस्क यांनी विरोध केला होता. त्यांना टेस्ला कार चीनमधून आयात करायची होती, तसेच स्टारलिंक सेवा सुरु करायाची होती. परंतू, भारत सरकार काही केल्या त्यांना परवानगी देत नव्हते. अखेर मस्क यांनी नमते घेतले आहे. 

मस्क यांनी स्टारलिंकचा युजर कशाकशासाठी वापर करतो, याची माहिती सरकारला शेअर करण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे स्टारलिंकचा भारतातील सेवा सुरु करण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. मस्क यांनी भारताच्या सर्व अटी मान्य केल्या आहेत. 

मस्क यांच्या स्टारलिंक लाँच करण्यासाठी भारत सरकारने कोणतीही सूट दिलेली नाहीय. सरकारच्या सर्व अटी आपल्याला मान्य असल्याचे पत्र मस्क यांच्या स्टारलिंकने केंद्राकडे सुपूर्द केले आहे. यानंतर आता स्टारलिंकला स्पेक्ट्रम वाटप केले जाणार आहे. 

भारत सरकारने काही वर्षांपूर्वी ट्विटर, फेसबुक, गुगलला देखील युजर्सची सर्व माहिती भारतातच ठेवणे आणि ती भारत सरकारशी जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा शेअर करणे बंधनकारक केले होते. भारतासारखी बाजारपेठ सोडणे या कंपन्यांना परवडणारे नाही. यामुळे या कंपन्यांनी तशी पाऊले उचलली होती. मात्र, मस्क हे अडेलतट्टूपणे तसेच राहिले होते. यामुळे त्यांची ना स्टारलिंक सुरु होऊ शकली ना टेस्ला. 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने सॅटेलाइट स्पेक्ट्रम आणि त्याच्या किंमतीची प्रक्रिया आधीच अंतिम केलेली आहे. यामुळे भारतात लवकरच उपग्रह सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत अमेझॉनची Kuiper ही सॅटेलाईट सर्व्हिसही उतरण्याची शक्यता आहे. जिओ आणि एअरटेलही या स्पर्धेत येण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: Elon Musk kneels before India; All conditions for Starlink agreed...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.