Twitter jobs: ट्विटरमध्ये कर्मचारी कपात! इलॉन मस्क यांचा नवा झटका, 50 टक्के कर्मचाऱ्यांना दाखवला जाऊ शकतो बाहेरचा रस्ता 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 09:24 AM2022-11-03T09:24:30+5:302022-11-03T09:25:06+5:30

Twitter jobs: ट्विटरचे मालक इलॉन मस्क हे कंपनीच्या जवळपास 3700 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहेत.

elon musk plans to cut nearly 3700 twitter jobs due to fulfill cost reduction strategy says report | Twitter jobs: ट्विटरमध्ये कर्मचारी कपात! इलॉन मस्क यांचा नवा झटका, 50 टक्के कर्मचाऱ्यांना दाखवला जाऊ शकतो बाहेरचा रस्ता 

Twitter jobs: ट्विटरमध्ये कर्मचारी कपात! इलॉन मस्क यांचा नवा झटका, 50 टक्के कर्मचाऱ्यांना दाखवला जाऊ शकतो बाहेरचा रस्ता 

googlenewsNext

नवी दिल्ली : इलॉन मस्क यांनी ट्विटर या सोशल मीडिया कंपनीची सूत्रे हाती घेतल्यापासून रोज नवनवीन निर्णयांच्या बातम्या येत आहेत. मात्र, आता एक अशी बातमी आली आहे, ज्यामुळे ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना समस्या निर्माण होऊ शकतो. ही बातमी ट्विटरमधील कर्मचारी कपात संदर्भात आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क हे कंपनीच्या जवळपास 3700 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहेत. या निर्णयामुळे ट्विटर या सोशल मीडिया कंपनीचे कर्मचारी जवळजवळ निम्म्याने कमी होतील. 

दरम्यान, ही धक्कादायक बातमी अशा वेळी समोर आली आहे, ज्यावेळी इलॉन मस्क हे 44 अब्ज डॉलर ट्विटर अधिग्रहण करार पूर्ण करण्यासाठी पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्लूमबर्गवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ट्विटरमधील कर्मचारी कपातीसदंर्भात अपडेट असलेल्या लोकांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या लोकांनी सांगितले की, इलॉन मस्क हे प्रभावित कर्मचार्‍यांना सूचित करण्यास 4 नोव्हेंबरपासून सुरूवात करतील. 

याशिवाय, इलॉन मस्क यांनी कंपनीचे सध्याचे काम कुठूनही धोरण बदलू इच्छित असल्याचा त्यांचा इरादाही व्यक्त केला असून कर्मचाऱ्यांना कार्यालयात रिपोर्ट करण्यास सांगितले आहे. याला काही अपवाद असू शकतात. ट्विटरच्या सॅन-फ्रान्सिस्को स्थित मुख्यालयात इलॉन मस्क आणि त्यांची टीम कर्मचारी कपात आणि इतर धोरणात्मक बदलांबाबत अनेक आयामांवर विचार करत आहेत आणि त्यावर काम करत आहेत. या अंतर्गत कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा विचार केला जात आहे. तत्सम बाबींमध्ये, ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येणार आहे, त्यांना 60 दिवसांचा पगार देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम
ट्विटरच्या व्यवस्थापकाने कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त वेळ काम करण्यास सांगितले आहे. तसेच, ट्विटर आता ब्लू टिकसाठी प्रत्येक युजर्सकडून 8 डॉलर म्हणजेच 660 रुपये प्रति महिना शुल्क आकारणार आहे. ही सुविधा सुरू करण्याची तयारी जोरात सुरू असून या कामासाठी येथील अभियंत्यांना अतिरिक्त काम करण्यास सांगितले आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला म्हणजे 07 नोव्हेंबरपर्यंत ब्लू टिक पेड फीचर लाँच करण्याची शक्यता आहे.

Web Title: elon musk plans to cut nearly 3700 twitter jobs due to fulfill cost reduction strategy says report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.