Elon Musk Twitter Poll: इलॉन मस्क आता Twitter चे बॉस राहणार नाहीत?, ५६ टक्के लोक म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 11:09 AM2022-12-19T11:09:24+5:302022-12-19T11:10:39+5:30

Elon Musk Twitter Poll: स्पेस एक्सचे संस्थापक आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क दररोज असं काहीतरी रंजक गोष्टी करत असतात की ज्याची जोरदार हवा होते.

elon musk poll results he asked can i step down as twitter head users answered | Elon Musk Twitter Poll: इलॉन मस्क आता Twitter चे बॉस राहणार नाहीत?, ५६ टक्के लोक म्हणाले...

Elon Musk Twitter Poll: इलॉन मस्क आता Twitter चे बॉस राहणार नाहीत?, ५६ टक्के लोक म्हणाले...

Next

Elon Musk Twitter Poll: स्पेस एक्सचे संस्थापक आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क दररोज असं काहीतरी रंजक गोष्टी करत असतात की ज्याची जोरदार हवा होते. आता मस्क यांनी काही तासांपूर्वी ट्विटरवर एक पोल सुरू केला होता. गेल्या काही तासांत या पोलवर आलेल्या प्रतिक्रिया पाहता यातून मोठे संकेत प्राप्त होत आहेत. 

ट्विटरचं प्रमुखपद सोडावं का? असा प्रश्न इलॉन मस्क यांनी विचारला होता. त्यावर आपलं मत नोंदवण्यास नेटिझन्सनं सुरुवात केली. मस्क यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार या पोलची आकडेवारी बरंच काही सांगून जाणारी आहे. तसंच लोकांच्या मनात काय आहे हेही यातून स्पष्ट होत आहे. 

पोलवर आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या मतानुसार इलॉन मस्क यांनी ट्विटरचं प्रमुखपद सोडावं याबाजूनं ५६.३ टक्के लोकांनी मत दिलं आहे. तर ४३.७ टक्के लोकांनी मस्क यांची बाजू घेतली आहे. पोलमधून समोर आलेला हा निकाल बरेच काही सांगत आहे, हा आकडा स्पष्टपणे दर्शवतो की ट्विटर युझर्स इलॉन मस्कच्या ट्विटरची मालकीवर अजिबात खूश नाहीत.

इलॉन मस्क यांनी पोल ट्विट करण्यासोबतच आपण या पोलमधून समोर येणारा निकाल स्वीकारणार असल्याचंही म्हटलं आहे. सुमारे ५ तासांपूर्वी इलॉन मस्कच्या या ट्विटवर १०,०४५,७८८ लोकांनी आपलं मत नोंदवलं होतं. तर आतापर्यंत १५३.३ हजार रिट्विट्स, १०४.१ हजार कोट ट्विट आणि २२१.८ हजार लाईक्स आले आहेत, हा आकडा क्षणाक्षणाला वेगानं वाढत आहे. इतकंच नाही तर लोक कमेंट करून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

Web Title: elon musk poll results he asked can i step down as twitter head users answered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.