Elon Musk विचार करत बसले, तिकडे Uber ने चीनच्या मदतीने केले 'हे' काम...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 03:47 PM2024-12-11T15:47:51+5:302024-12-11T15:48:38+5:30

उबरने चीनी कंपनीसोबत मिळून एक मोठी घोषणा केली आहे.

Elon Musk sat thinking, Uber did 'this' with the help of China... | Elon Musk विचार करत बसले, तिकडे Uber ने चीनच्या मदतीने केले 'हे' काम...

Elon Musk विचार करत बसले, तिकडे Uber ने चीनच्या मदतीने केले 'हे' काम...

Elon Musk Cybercab Robotaxi: Tesla सारखी फ्यूचरिस्टिक इलेक्ट्रिक कार बनवून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले Elon Musk आता आणखी एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. इलॉन मस्क लवकरच Cybercab Robotaxi लॉन्च करणार आहेत. दरम्यान, अॅप बेस्ड टॅक्सी सर्व्हिस Uber ने एक मोठी घोषणा केली आहे. या कामात चीनची मोठी कंपनी मदत करणार आहे. 

उबर लवकरच चीनच्या WeRide सोबत मिळून रोबो टॅक्सी सेवा सुरू करणार आहे. या सेवेअंतर्गत कंपनी अशा कॅबमधून टॅक्सी सेवा देईल, ज्यामध्ये सेल्फ ड्रायव्हिंगसारखे तंत्रज्ञान वापरलेले असेल. हे चीनच्या टेस्ला सायबरकॅब प्रोजेक्टला हे थेट आव्हान असेल.

या देशात सर्वप्रथम सुरू होणार 
Uber च्या माहितीनुसार, ही रोबोटॅक्सी सेवा सर्वप्रथम अबू धाबी, संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सुरू होणार आहे. या सेवेसाठी चीनची व्ही-राइडची रोबो टॅक्सी उबेर ॲपवर एकत्रित केली जाईल. पण, सुरुवातीला Uber या टॅक्सींसोबत ड्रायव्हरदेखील ठेवेल, जेणेकरुन सामान्य लोकांना सुरक्षित आणि विश्वासार्ह अनुभव मिळेल.

इलॉन मस्क कधी लॉन्च करणार?
एकीकडे, उबेरची ही सेवा 2025 च्या अखेरीस अबू धाबीमध्ये कार्यान्वित होईल. तर इलॉन मस्कच्या सायबरकॅबचे उत्पादन 2026 च्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे. रोबो टॅक्सीमध्ये एडीएएस लेव्हल 5 आहे, ज्यामध्ये कॅमेरे आणि सेन्सरच्या मदतीने कॉम्प्युटर स्वतः कार चालवतो.

 

Web Title: Elon Musk sat thinking, Uber did 'this' with the help of China...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.