Twitter मधून होणार तगडी कमाई! YouTube पेक्षा चांगली सिस्टम आणणार, कसं ते मस्क यांनीच सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 11:38 AM2022-11-07T11:38:37+5:302022-11-07T11:40:10+5:30
इलॉन मस्क यांचा ट्विटरबाबतचा प्लान आता हळूहळू स्पष्ट होऊ लागला आहे. कंपनी लवकरच यातून कंटेंन्ट क्रिएटर्सना देखील पैसे कमावण्याची संधी देणार आहे.
नवी दिल्ली-
इलॉन मस्क यांचा ट्विटरबाबतचा प्लान आता हळूहळू स्पष्ट होऊ लागला आहे. कंपनी लवकरच यातून कंटेंन्ट क्रिएटर्सना देखील पैसे कमावण्याची संधी देणार आहे. मस्क यांनी याबाबत सर्व माहिती स्पष्ट केली आहे. येत्या काळात युझर्स ट्विटरवर मोठे व्हिडिओ देखील पोस्ट करू शकणार आहेत. ट्विटर सध्या अशा मॉनिटायजेशन प्लानवर काम करत आहे की ज्यापुढे यूट्यूब देखील फेल ठरू शकतं.
रिपोर्ट नुसार कंपीनी सर्व प्रकारच्या कंटेंन्ट क्रिएटर्सना कमाईची संधी देणार आहे. म्हणजेच व्हिडिओशिवाय इतर कंटेंन्टमधूनही युजर्स पैसे कमावू शकणार आहेत. यूट्यूबकडून क्रिएटर्सना ५५ टक्के अॅड रेवेन्यू दिला जातो असं ट्विट एका युझरनं केलं होतं. त्यावर खुद्द इलॉन मस्क यांनीच आम्ही लवकरच याला मागे टाकू असं म्हटलं होतं. त्यावरुनच मस्क यांनी ट्विटरच्या मॉनिटायझेशनबाबत संकेत दिले होते.
यूट्यूबपेक्षा दमदार असणार ट्विटरचं मॉनिटायजेशन
यूट्यूब सारखंच जर ट्विटरवर मॉनिटायजेशन मिळालं तर यूझर्स मोठे व्हिडिओ ट्विटरवरही शेअर करू लागतील असं एका युझरनं ट्विट केलं. त्यावर मस्क यांनी रिप्लाय देत ब्लू सब्सक्रिप्शनसाठी आम्ही आता ४२ मिनिटांचा आणि १०८० रेज्युलेशनचा व्हिडिओ ट्विट करू शकत आहोत. येत्या महिन्यात याची मर्यादा निश्चित केली जाईल असं म्हटलं. आता मॉनिटायजेशनबाबत येत्या काळात मस्क सविस्तर माहिती देऊ शकतात. याशिवाय मोठा मजकूर ट्विटला अटॅच करण्याचं फिचर देखील लवकरच आणलं जाईल. तसंच कंटेंन्टमधूनही यूझरला पैसा मिळू शकतो.
मस्क यांनी ४४ बिलियन डॉलरमध्ये ट्विटरची डील पक्की करत मालकी हक्क प्राप्त केला आहे. ट्विटरचा ताबा मिळताच मस्क यांनी धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. यात अनेक कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. तसंच ब्लू सब्सक्रिप्शन आणखी काही देशांमध्ये जारी करण्यात आलं आहे. यात युझर्सना वेगवेगळे फिचर्स ऑफर केले जाणार आहेत.