इलॉन मस्क यांचा ट्विटर कर्मचाऱ्यांना धक्का; चिनी मातीचे बेसिन घेऊन पोहोचले मुख्यालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 07:51 AM2022-10-28T07:51:10+5:302022-10-28T07:52:56+5:30
Elon Musk : मुख्यालयात जाण्याअगोदर मस्क यांनी आपल्या 'ट्विटर बायो 'मध्ये 'चीफ ट्विट' म्हणजेच ट्विटरचे प्रमुख असा उल्लेख केला होता. त्यामुळे सोशल मीडिया जगतात त्यांच्या या दौऱ्याची चर्चा रंगली होती.
सॅन फ्रान्सिस्को: सोशल मीडिया कंपनी ट्विटर विकत घेण्याच्या अगोदर जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांनी सॅन फ्रान्सिस्को येथील ट्विटर मुख्यालयाला भेट देऊन सर्वांना धक्का दिला. विशेष म्हणजे, तेथे जाताना त्यांनी चिनी मातीचे बेसिन हातात घेतल्याचेही पाहायला मिळाले.
मुख्यालयात जाण्याअगोदर मस्क यांनी आपल्या 'ट्विटर बायो 'मध्ये 'चीफ ट्विट' म्हणजेच ट्विटरचे प्रमुख असा उल्लेख केला होता. त्यामुळे सोशल मीडिया जगतात त्यांच्या या दौऱ्याची चर्चा रंगली होती.
ट्विटरमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार का?
मस्क यांनी द्विटर खरेदी केल्यानंतर तेथील अनेक लोकांना नारळ दिला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे शेकडो कर्मचारी धास्तावले होते; परंतु, नोकरकपातीची कोणतीही योजना नसल्याचे मस्क यांनी स्पष्ट केल्याचे समजते. त्यामुळे कर्मचायांना मोठा दिलासा मिळाला आहे.
'लेट दॅट सिंक इन'
या इंग्रजी म्हणीचा वापर एखादी घटना समजून घेण्यासाठी आणि ती शांतपणे स्वीकारत असल्यासाठी केला जातो. याचाच अर्थ मस्क आता द्विटर विकत घेणार आहेत.
मस्क का म्हणाले 'लेट दॅट सिंक इन'?
मस्क यांनी द्विटरच्या मुख्यालयात जातानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमधील व्हिडीओत ते स्वतः चिनी मातीचे बेसिन हातात घेऊन जाताना दिसतात. सोबत त्यांनी लिहिले आहे की, द्विटरच्या मुख्यालयात जात आहे, लेट दॅट सिक इन.
द्विटरचे वापरकर्ते
जगात- २३.८ कोटी | भारतात - २.३६ कोटी