Elon Musk Twitter:7 दिवस, 7 मोठे निर्णय; Elon Musk मालक होताच Twitterमध्ये मोठे बदल, वाचा सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 02:42 PM2022-11-03T14:42:25+5:302022-11-03T15:05:05+5:30

Elon Musk Twitter: इलोन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेताच मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

Elon Musk Twitter: 7 Days, 7 Big Decisions; As soon as Elon Musk became the owner of Twitter, he took big change in Twitter | Elon Musk Twitter:7 दिवस, 7 मोठे निर्णय; Elon Musk मालक होताच Twitterमध्ये मोठे बदल, वाचा सविस्तर...

Elon Musk Twitter:7 दिवस, 7 मोठे निर्णय; Elon Musk मालक होताच Twitterमध्ये मोठे बदल, वाचा सविस्तर...

googlenewsNext

Elon Musk Twitter: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलोन मस्क त्यांच्या मोठ-मोठ्या निर्णयांसाठी ओळखले जातात. टेस्ला असो किंवा स्पेसएक्स, मस्क यांनी नेहमीच स्वतःच्या मनाला पटेल, तेच केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ट्विटरची सूत्रे हातात घेतली. यानंतर मस्क एका पाठोपाठ एक मोठे निर्णय घेताना दिसत आहेत. 

ट्विटर विकत घेण्याची घोषणा केल्यापासून इलॉन मस्क चर्चेत आले होते. अखेर 27 ऑक्टोबर रोजी मस्क ट्विटरचे मालक झाले. ट्विटरचा ताबा घेताच त्यांनी झटपट निर्णय घेण्यास सुरुवात केली. कंपनीतील बड्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यापासून ते ब्ल्यूटिक व्हेरिफिकेशनसाठी पैसे वसूल करण्यापर्यंत, त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले.

इलॉन मस्क यांनी अवघ्या 7 दिवसात 7 मोठे निर्णय घेऊन सर्वांनाच चकित केले आहे.

27 ऑक्टोबर- हा तो दिवस होता जेव्हा इलॉन मस्क अधिकृतपणे ट्विटरचे मालक झाले. जॉईन होताच त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आणि तीन मोठ्या अधिकाऱ्यांना बाहेर केले. मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल, सीएफओ नेड सेगल आणि लीगल हेड विजया गड्डे यांना बाहेरचा रस्ता दाखवला.

28 ऑक्टोबर- Twitter चे CEO बनल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मस्क यांनी Twitter च्या कंटेंटवर काम करण्यासाठी एक समिती स्थापन केली. मस्कची ही नवी टीम ट्विटरवर चालणाऱ्या कंटेंटवर नजर ठेवणार आहे.

29 ऑक्टोबर- इलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेताच वर्णद्वेषाचा मुद्दा जोरात उठू लागला. यावर मस्क यांनी वर्णद्वेष आणि धोरणाबाबतची आपली भूमिका अत्यंत कठोर असेल आणि त्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट केले.

30 ऑक्टोबर- ट्विटरचा बॉस बनल्यानंतर मस्क ट्विटरमध्ये बदल करण्याकडे लक्ष देत आहेत. याअंतर्गत, त्यांनी युजर्सना ट्विट केले आणि विचारले की, Vine अॅप पुन्हा सुरू करावे का? Vine हे Twitter चे छोटे व्हिडिओ अॅप आहे, जे 2017 मध्ये बंद करण्यात आले होते. 

31 ऑक्टोबर- हा तो दिवस होता जेव्हा मस्क यांनी अधिकृतपणे ट्विटरचे मालक झाल्याचे जाहीर केले. याच दिवशी त्यांनी संचालक मंडळही विसर्जित केले. तसेच, कंपनीत मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी होऊ शकते, असेही सांगितले.

1 नोव्हेंबर- ट्विटरवर मस्कचे ट्विट सर्वाधिक ट्रेंडिंग आहे, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की, आता ट्विटरवर ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी $8 फी भरावी लागेल. याबाबत लोकांनी मस्क यांच्याकडे तक्रारही केली. पण, मस्क यांनी निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले.

2 नोव्हेंबर- मस्क यांनी ट्विटरवरून सुमारे 3700 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचे स्पष्ट केले. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार शुक्रवारपर्यंत हा निर्णय घेतला जाईल.

Web Title: Elon Musk Twitter: 7 Days, 7 Big Decisions; As soon as Elon Musk became the owner of Twitter, he took big change in Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.