Elon Musk Twitter Deal: ट्विटर मस्कच्या मालकीचे झाले! सीईओ पराग अग्रवालांसह तिघांना काढून टाकले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 08:14 AM2022-10-28T08:14:24+5:302022-10-28T08:14:46+5:30

ट्विटर ताब्यात येताच मस्क यांनी भारतीय वंशाचे सीईओ पराग अग्रवाल, पॉलिसी हेड विजया गड्डे आणि चीफ फाइनेंसियल ऑफिसर नेड सेगल यांना काढून टाकले आहे.

Elon Musk Twitter Deal: Elon Musk completed deal of Twitter; Fired CEO  Parag Agrawal and 2 others top officials reports | Elon Musk Twitter Deal: ट्विटर मस्कच्या मालकीचे झाले! सीईओ पराग अग्रवालांसह तिघांना काढून टाकले

Elon Musk Twitter Deal: ट्विटर मस्कच्या मालकीचे झाले! सीईओ पराग अग्रवालांसह तिघांना काढून टाकले

googlenewsNext

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर खरेदी केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा वाद सुरु होता. सुरुवातीला ४४ अब्जांची ऑफर देऊन एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी करणार असल्याची ऑफर दिली होती. परंतू, नंतर पैसे जमेनात म्हणून त्यातून काढता पाय घेतला होता. ट्विटरने न्यायालयात धाव घेताच मस्क यांना एकतर ट्विटर खरेदी करणे किंवा न्यायालयीन कारवाईला सामोरे जाणे असे दोनच पर्याय उरले होते. अखेर शुक्रवारी सायंकाळपर्यंत मस्क यांना डील पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मस्क यांनी काही गुंतवणूकदारांना सोबत घेऊन ही डील पूर्ण केली आहे. 

याचबरोबर ट्विटर ताब्यात येताच मस्क यांनी भारतीय वंशाचे सीईओ पराग अग्रवाल, पॉलिसी हेड विजया गड्डे आणि चीफ फाइनेंसियल ऑफिसर नेड सेगल यांना काढून टाकले आहे. अमेरिकी मीडियाने याचे वृत्त दिले आहे. ट्विटरने अद्याप या अधिकाऱ्यांना काढून टाकण्यावर काही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, मस्क यांच्या या पावलामुळे ट्विटरच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मस्क यांनी ७५ टक्के कर्मचाऱ्यांना नारळ देणार असल्याचे काही दिवसांपूर्वी झालेल्या गुंतवणूकदारांच्या बैठकीत स्पष्ट केले होते. परंतू नंतर मस्क यांनीच यावर पडदा टाकत कर्मचाऱ्यांना काढणार नाही असे म्हटले होते. 

डील पूर्ण करण्यापूर्वी एक दिवस आदी मस्क बेसिन सिंक घेऊन ट्विटरच्या कार्यालयात पोहोचले होते. ट्विटर ताब्यात घेताच मस्क यांनी लगेचच आपल्या अकाऊंटवरील बायोडेटावर Chief Twit असे लिहिले आहे. तसेच लोकेशन ट्विटर हेडक्वार्टर असे केले आहे. 

मस्क का म्हणाले 'लेट दॅट सिंक इन'? 
मस्क यांनी द्विटरच्या मुख्यालयात जातानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमधील व्हिडीओत ते स्वतः चिनी मातीचे बेसिन हातात घेऊन जाताना दिसतात. सोबत त्यांनी लिहिले आहे की, द्विटरच्या मुख्यालयात जात आहे, लेट दॅट सिक इन.

द्विटरचे वापरकर्ते
जगात- २३.८ कोटी | भारतात - २.३६ कोटी

Web Title: Elon Musk Twitter Deal: Elon Musk completed deal of Twitter; Fired CEO  Parag Agrawal and 2 others top officials reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.