Elon Musk मालक होताच Twitterची धडक कारवाई, 54 हजार भारतीयांचे अकाउंट्स बॅन...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 07:01 PM2022-11-01T19:01:11+5:302022-11-01T19:20:12+5:30

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk Twitterचे मालक होताच, ते कंपनीत अनेक बदल करत आहेत.

Elon Musk twitter deal; Twitter took action, accounts of 54 Indians were banned | Elon Musk मालक होताच Twitterची धडक कारवाई, 54 हजार भारतीयांचे अकाउंट्स बॅन...

Elon Musk मालक होताच Twitterची धडक कारवाई, 54 हजार भारतीयांचे अकाउंट्स बॅन...

Next

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या Elon Musk यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट Twitter खरेदी केले आहे. इलॉन मस्क मालक होताच त्यांनी कंपनीतील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. यात भारतीय वंशाच्या CEO पराग अग्रवाल यांचाही समावेश आहे. यानंतर आता ट्विटरने हजारो भारतीयांवर कारवाई करत देशातील 52,141 युजर्सचे अकाउंट्स बॅन केले आहेत.

दर महिन्याप्रमाणे ट्विटरने आपली मंथली रिपोर्ट सादर केली, यात ही माहिती समोर आली आहे. हे अकाउंट्स 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबरदरम्यान बंद केले आहेत. हे अकाउंट्स बाल लैंगिक शोषण, नग्नता आणि याप्रकारच्या कंटेंटला शेअर केल्यामुळे बंद करण्यात आले आहेत. इलॉन मस्क आल्यानंतर ट्विटरने 1982 अकाउंट्सना दहशतवाद पसरवण्याच्या आरोपाखाली बॅन केले आहे.

ITनियमाप्रमाणे रिपोर्ट जारी 
ट्विटरने आपल्या मंथली रिपोर्टमध्ये सांगितले की, भारतीय यूजर्सकडून 157 तक्रारी आल्या होत्या. ग्रीवांस मॅकेनिज्म अंतर्गत मिळालेल्या तक्रारीवरुन 129 URL वर कारवाई करण्यात आली आहे. ही रिपोर्ट नवीन आयटी नियमामुळे जारी करण्यात येते. कंपनीने मिळालेल्या सर्व रिपोर्ट रिसॉल्व्ह केल्या आहेत.  विशेष म्हणजे, या नियमामुळे दर महिन्याला व्हॉट्सअॅपदेखील आपले लाखो अकाउंट्स बंद करत आहे. आयटी नियम 2021नुसार, मोठ्या टेक प्लॅटफॉर्म्सना ग्रीवांस अधिकारी नेमने गरजेचे आहे. तसेच, दर महिन्याला कंप्लायंस रिपोर्ट जारी करण्याची अट आहे.

Web Title: Elon Musk twitter deal; Twitter took action, accounts of 54 Indians were banned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.