इलॉन मस्क WhatsApp ला देणार टक्कर! 'एक्स'वर येणार नवीन फिचर, कॉलिंगसह या सुविधा मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 07:19 PM2024-08-29T19:19:34+5:302024-08-29T19:21:54+5:30
Elon Musk, WhatsApp : इलॉन मस्क आता WhatsApp ला टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. ट्विटवर अनेक नवे फिचर आणण्याची तयारी मस्क करत आहेत.
Elon Musk, WhatsApp : अमेरिकी उद्योगपती इलॉन मस्क यांनी ट्विटर आपल्या ताब्यात घेतल्यापासून अनेक मोठे बदल केले आहेत. ट्विटरचे नाव बदलून आता एक्स करण्यात आले. मस्क यांनी वापरकर्त्यांना काही नवीन फिचरही दिले आहेत. आता ट्विटरवर आणखी एक नवीन फिचर येणार आहे. हे फिचर अतिशय उपयुक्त ठरणार आहे. हे फिचरमुळे व्हॉट्सअपला स्पर्धा असणार आहे. लवकरच तुम्हाला एक्सवर व्हिडीओ कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.
येत्या काही वर्षांत Reliance कुठे असेल? मुकेश अंबानी यांनी सांगितले त्यांचे 'स्वप्न', म्हणाले...
मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच एक नवीन फीचर उपलब्ध होणार आहे. यामध्ये यूजर्स व्हिडीओ कॉलिंग करू शकतात. सध्या या फिचरचा विचार केला जात असून कंपनीने तयारीही केली आहे. लवकरच युजर्संना याचे ट्रायल फीचर मिळेल. आत्तापर्यंत व्हिडीओ कॉलिंग फीचरवर गुगल, व्हॉट्सॲप आणि झूमचा बोलबाला आहे, आता या स्पर्धेत एक्स प्लॅटफॉर्मही येणार आहे.
व्हिडीओ कॉलिंगसोबतच कंपनी कॉलिंग फीचरबाबतही निर्णय घेणार आहे. व्हिडीओ व्यतिरिक्त, तुम्ही सामान्य कॉलिंग देखील करू शकता. मात्र, आतापर्यंत या फिचरबाबत फक्त चर्चाच होत आहे. हे फीचर केव्हा आणले जाईल हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्याच्या चाचणीचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती इलॉन मस्कने काही काळापूर्वी एक्सवर शेअर केली होती.
इलॉन मस्क यांच्याकडे ट्विटर गेल्यानंतर त्यांनी अनेक बदल केले आहेत.त्यांनी त्याची URL देखील पूर्णपणे बदलली. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार तुम्हाला कॉन्फरन्स कॉलिंगचा पर्यायही दिला जाईल. तुम्ही सहज कॉल करू शकाल. यासोबतच तुम्ही इतर लोकांनाही या कॉलमध्ये जोडू शकता. वापरकर्ते या नवीन फीचरची आतुरतेने वाट पाहत आहेत.