Elon Musk यांचा मोठा निर्णय; 150 कोटी ट्विटर अकाउंट डिलीट होणार; पण का..?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 03:18 PM2022-12-09T15:18:13+5:302022-12-09T15:18:38+5:30
Elon Musk Tweet: ट्विटरला विकत घेतल्यापासून इलॉन मस्क अनेक धक्कादायक निर्णय घेत आहेत.
Elon Musk: टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरला विकत घेतल्यापासून कंपनीसंदर्भात ते अनेक धक्कादायक निर्णय घेत आहेत. यात ब्लू टीकसाठी पैसे आकारणे असो किंवा हजारो कर्मचाऱ्यांची कपात असो...मस्क यांच्या निर्णयाने सर्वांनाच धक्के बसत आहेत. यातच आता इलॉन मस्क यांनी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.
Twitter will soon start freeing the name space of 1.5 billion accounts
— Elon Musk (@elonmusk) December 9, 2022
1.5 अब्ज ट्विटर अकाउंट्स बंद होणार
इलॉन मस्क लवकरच 1.5 अब्ज (150 कोटी) ट्विटर अकाउंट डिलीट करणार असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. कंपनीच्या या पाऊलामुळे 150 कोटी खाती कमी होणार आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले की, कंपनीच्या या प्रक्रियेअंतर्गत अशी खाती हटवली जातील, ज्यावरून कोणतेही ट्विट केले गेले नाही किंवा ते वर्षानुवर्षे लॉग इन झाले नाहीत.
These are obvious account deletions with no tweets & no log in for years
— Elon Musk (@elonmusk) December 9, 2022
माहितीसाठी तुम्हाला सांगू इच्छितोत की, ट्विटर स्पेसमध्ये अशी अनेक खाती आहेत, जी गेल्या अनेक वर्षांपासून वापरली जात नाहीत. किंवा वापरकर्ता पासवर्ड विसरल्यामुळे यूजर लॉगिन करू शकला नाही आणि दुसरे खाते तयार केले. अशा निष्क्रीय खात्यांना डिलीट करण्याचा निर्णय मस्क यांनी घेतला आहे.