लोडशेडिंगवर इन्व्हर्टरपेक्षा स्वस्त उपाय; लाईट गेल्यावर फक्त 290 रुपयांमध्ये लखलखणार घर  

By सिद्धेश जाधव | Published: April 13, 2022 03:13 PM2022-04-13T15:13:47+5:302022-04-13T15:14:00+5:30

वीज गेल्यावर देखील घरात प्रकाश देणारे अनेक डिवाइज बाजारात उपलब्ध आहेत. यातील काही रिचार्जेबल डिवाइसची माहिती आपण घेणार आहोत.  

Energy Saving Cheapest Rechargeable Led Bulbs With Power Back Up To 3 To 5 Hours  | लोडशेडिंगवर इन्व्हर्टरपेक्षा स्वस्त उपाय; लाईट गेल्यावर फक्त 290 रुपयांमध्ये लखलखणार घर  

लोडशेडिंगवर इन्व्हर्टरपेक्षा स्वस्त उपाय; लाईट गेल्यावर फक्त 290 रुपयांमध्ये लखलखणार घर  

googlenewsNext

उन्हाळ्यात विजेची मागणी वाढते त्यामुळे वीज कंपन्या भारनियमन करत असतात. परंतु त्यामुळे इन्व्हर्टर किंवा जेनरेटर नसलेली घरं अंधारात राहतात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी अशा डिवाइसची माहिती घेऊन आलो आहोत जे वीज गेल्यानंतर देखील तुम्हाला प्रकाश देतील. यासाठी तुम्हाला इन्व्हर्टर किंवा जेनरेटर इतका खर्च करावा लागणार नाही. चला जाऊन घेऊया ऑनलाईन उपलब्ध असलेल्या रिचार्जेबल इमर्जन्सी एलईडी बल्ब्स बाबत.  

DesiDiya 9 Watt B22 Base 6500k Inverter Rechargeable Emergency LED Bulb 

DesiDiya 9 Watt Emergency LED Bulb मध्ये 2200mAh ची बॅटरी मिळते. जी सिंगल चार्जवर 4 तासांचा बॅटरी बॅकअप देते. हा बल्ब फुल चार्ज होण्यासाठी 8 ते 10 तास घेतो. याची किंमत 549 रुपये आहे, परंतु अ‍ॅमेझॉनवर हा 329 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 

Philips 10W B22 LED Emergency Inverter Bulb 

एका खोलीत 10W चा बल्ब चांगला प्रकाश देतो म्हणून याचा वापर जास्त केला जातो. हा बल्ब चालू केल्यावर आपोआप चार्ज होण्यास सुरुवात होते. लाईट गेल्यावर फुल चार्ज असल्यास 4 तासांपर्यंत बॅकअप मिळतो. हा तुम्ही फ्लिपकार्टवरून 499 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. 

Halonix Prime 9W B22 6500K Cool Day Light Inverter Rechargeable Emergency Led Bulb 

Halonix Prime 9W Emergency Led Bulb ची मूळ किंमत 499 रुपये आहे, परंतु अ‍ॅमेझॉनकडून 100 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. म्हणजे हा रिचार्जेबल एलईडी बल्ब 399 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सोबत कंपनी 6 महिन्यांची वॉरंटी देखील देत आहे. याचा वर इमर्जन्सी लाईट म्हणून वापरता येईल. लाईट गेल्यावर हा बल्ब 4 तास प्रकाश देतो. याचा चार्जिंग टाईम 8 ते 10 तास आहे. 

Gesto 9W Inverter Rechargeable battery Operated Emergency Led Bulb 

Gesto 9W Emergency Led Bulb ची किंमत 1,999 रुपये आहे, परंतु अ‍ॅमेझॉनवर हा बल्ब 290 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. यातील 2200mAh ची 4 ते 6 तासांत फुल चार्ज होते. हा 3 ते 5 तासांपर्यंतची बॅटरी लाईफ देतो.  

Web Title: Energy Saving Cheapest Rechargeable Led Bulbs With Power Back Up To 3 To 5 Hours 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.