5,000mAh बॅटरीसह लो बजेटमध्ये Tecno POP 5P लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
By सिद्धेश जाधव | Published: August 5, 2021 07:35 PM2021-08-05T19:35:28+5:302021-08-05T19:36:13+5:30
Budget Phone Tecno POP 5P: Tecno POP 5P च्या मागे एक ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. पावर बॅकअपसाठी Tecno POP 5P मध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळते.
स्मार्टफोन निर्माता कंपनी TECNO Mobile आपल्या किफायतशीर स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. आजच कंपनीचा Tecno Pova 2 स्मार्टफोन भारतात खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. हा फोन 7,000mAh च्या अवाढव्य बॅटरीला सपोर्ट करतो. तर दुसरीकडे जागतिक बाजारात टेक्नोने एक नवीन लो बजेट स्मार्टफोन Tecno POP 5P लाँच केला आहे.
Tecno POP 5P चे स्पेसिफिकेशन्स
Tecno POP 5P स्मार्टफोनमध्ये 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा टेक्नो स्मार्टफोन अँड्रॉइड 10 (Go Edition) वर चालतो. या फोनमध्ये 1.3गीगाहर्ट्ज क्वॉडकोर प्रोसेसर देण्यात आला आहे, यातील चिपसेटची माहिती मात्र गुलदस्त्यात आहे.
Tecno POP 5P च्या मागे एक ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात एलईडी फ्लॅशसह 5 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि एक एआय सेन्सर देण्यात आला आहे. हा लो बजेट टेक्नो फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी Tecno POP 5P मध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळते.
Tecno POP 5P ची किंमत
Tecno POP 5P सध्या नायजेरियामध्ये लाँच करण्यात आला आहे. तिथे या स्मार्टफोनचा फक्त एकच व्हेरिएंट सादर करण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये 2GB रॅम आणि 32GB ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आली आहे. नायजेरियात Tecno POP 5 स्मार्टफोनची किंमत NGN 44,000 ठेवण्यात आली आहे. ही किंमत भारतीय चलनात रूपांतरित केल्यास 7,900 रुपयांच्या आसपास होते.