घरच्या घरी बदलता येणार eSIM; iPhone च्या नव्या फिचरमुळे मोबाईल दुकानाच्या चकरा मारण्याची गरज नाही 

By सिद्धेश जाधव | Published: June 11, 2022 01:09 PM2022-06-11T13:09:30+5:302022-06-11T13:09:42+5:30

Apple iPhone युजर्सना आता नवीन डिवाइसवर eSIM ट्रांसफर करण्यासाठी टेलीकॉम कंपन्यांची दुकानात जाण्याची गरज नाही.  

Esim bluetooth transfer feature could come in ios 16 for iphones leak suggests   | घरच्या घरी बदलता येणार eSIM; iPhone च्या नव्या फिचरमुळे मोबाईल दुकानाच्या चकरा मारण्याची गरज नाही 

घरच्या घरी बदलता येणार eSIM; iPhone च्या नव्या फिचरमुळे मोबाईल दुकानाच्या चकरा मारण्याची गरज नाही 

Next

Apple नं गेल्या आठवड्यात यंदाच्या WWDC 2022 इव्हेंटमधून अनेक प्रोडक्ट्सची घोषणा केली आहे. यात नव्या ऑपरेटिंग सिस्टम iOS 16 चा देखील समावेश आहे. इव्हेंटमधून अ‍ॅप्पलनं या ओएसमधून आयफोनमध्ये कोणते बदल होणार याची माहिती दिली होती. परंतु सर्वच फीचर्सची माहिती कंपनीनं दिली नाही, काही फीचर्स आता लिक्सच्या माध्यमातून समोर येत आहेत.  

Apple iPhone युजर्सना आता नवीन डिवाइसवर eSIM ट्रांसफर करण्यासाठी टेलीकॉम कंपन्यांच्या स्टोर्सवर जाण्याची गरज नाही. युजर्स काही सेकंदात eSIM एक डिवाइसवरून दुसऱ्या डिवाइसमध्ये ट्रांसफर करू शकतील. iOS 16 मध्ये नवीन फीचर मिळेल, जायचा वापर करून युजर आपल्या डिवाइसमधील eSIM दुसऱ्या डिवाइसमध्ये ब्लूटूथच्या माध्यमातून ट्रांसफर करू शकतील.  

याआधी iPhone युजर्सना नवीन अ‍ॅप्पल डिवाइसमध्ये eSIM ट्रांसफर करण्यासाठी जुन्या डिवाइसमधून ते डिलीट करावं लागत होतं. त्यानंतर टेलिकॉम ऑपरेटरच्या मदतीनं नव्या डिवाइसमध्ये इंस्टॉल करावं लागत होतं. परंतु आता एक क्युआर कोड स्कॅन करून हे काम काही सेकंदात करता येईल. iOS 16 मधील या फिचरमुळे आयफोन युजर्सचा खूप वेळ वाचेल.  

ट्विटर युजर @carsonwaldrop (Carson) नं आपल्या ट्विटर हँडलवरून या नव्या फिचरची माहिती दिली आहे. ट्विटवाढेल स्क्रीन शॉटमध्ये eSIM एका डिवाइसमधून दुसऱ्या डिवाइसमध्ये ट्रांसफर होत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हे फीचर जेव्हा दोन्ही डिवाइसेजमध्ये लेटेस्ट iOS 16 ऑपरेटिंग सिस्टम असेल तेव्हाच वापरता येईल.  

iOS 16 कधी आणि कोणत्या डिवाइससाठी उपलब्ध होईल?  

Apple iOS 16 चा डेव्हलपर प्रिव्यू Apple Developer Program मेम्बर्ससाठी उपलब्ध झाला आहे. परत्नू पब्लिक बीटा व्हर्जन येण्यासाठी पुढील महिना उजाडेल. हे व्हर्जन beta.apple.com वरून पुढील डिव्हाइसेससाठी उपलब्ध होईल: 

  • Apple iPhone 13/ 13 mini/ 13 Pro/ 13 Pro Max 
  • Apple iPhone 12/ 12 mini/ 12 Pro/ 12 Pro Max 
  • Apple iPhone 11/ 11 Pro/ 11 Pro Max 
  • Apple iPhone X/ XS/ XS Max/ XR 
  • Apple iPhone 8/ 8 Plus 
  • Apple iPhone SE (2nd जेन आणि आणि त्यानंतरचे मॉडेल) 

Web Title: Esim bluetooth transfer feature could come in ios 16 for iphones leak suggests  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.