‘या’ कारणामुळे आयफोन्ससह सर्वच स्मार्टफोन सोबत मिळू शकतो USB-C चार्जर  

By सिद्धेश जाधव | Published: September 22, 2021 07:08 PM2021-09-22T19:08:49+5:302021-09-22T19:12:19+5:30

EU to present proposal for common charger: युरोपियन कमिशन गुरुवारी मोबाईल फोन, टॅबलेट आणि हेडफोन्ससाठी एकच स्टँडर्ड चार्जर देणे बंधनकारक करण्याचा कायदेशीर प्रस्ताव मांडणार आहे.  

Eu to introduce usb c charger legislation on thursday  | ‘या’ कारणामुळे आयफोन्ससह सर्वच स्मार्टफोन सोबत मिळू शकतो USB-C चार्जर  

‘या’ कारणामुळे आयफोन्ससह सर्वच स्मार्टफोन सोबत मिळू शकतो USB-C चार्जर  

googlenewsNext

येत्या काळात सर्वच मोबाईल फोन, टॅबलेट आणि हेडफोन सोबत USB-C चार्जर दिला जाऊ शकतो. अगदी अ‍ॅप्पलचे आयफोन देखील टाईप सी पोर्टसह बाजारात येऊ शकतात. यामागचे कारण म्हणजे युरोपियन कमिशन उद्या म्हणजे गुरुवारी मोबाईल फोन, टॅबलेट आणि हेडफोन्ससाठी एकच स्टँडर्ड चार्जर देणे बंधनकारक करण्याचा कायदेशीर प्रस्ताव मांडणार आहे.  

2024 पर्यंत मोबाईल फोन्समध्ये USB-C चार्जर होणार बंधनकारक  

युजर्सच्या सोयीसाठी आणि पर्यावरणासाठी या कायद्याची मागणी गेल्या एका दशकापासून युरोपियन युनियनमध्ये केली जात आहे. त्यामुळे आता कमिशन गॅजेट्स आणि चार्जरची वेगवेगळी विक्री केली जावी आणि सर्व गॅजेट्ससाठी एकच चार्जर असावा असा कायदा करू शकते.  

जर हा कायदा अस्तित्वात आला तर 2024 पर्यंत युरोपियन युनियनमध्ये विकल्या जाणाऱ्या सर्व मोबाईल फोनमध्ये USB-C चार्जिंग पोर्ट दिसेल. विशेष म्हणजे अँड्रॉइड स्मार्टफोन्स सध्या USB-C पोर्टचा वापर करत आहेत फक्त टेक दिग्गज Apple आपल्या iPhones मध्ये लायटनींग केबलचा वापर करत आहे.  

अ‍ॅप्पल आयफोनवर कसा परिणाम होईल  

फक्त चार्जरच नव्हे तर चार्जिंग सॉफ्टवेयर देखील एकच असावे अशी मागणी या कायद्यातून करण्यात आली आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक कचऱ्यात वाढ होईल. तसेच यामुळे स्मार्टफोनमधील इनोव्हेशन (नावीन्य) कमी होईल आणि त्याचा त्रास ग्राहकांना होईल, असे अ‍ॅप्पलचे म्हणणे आहे.  

Web Title: Eu to introduce usb c charger legislation on thursday 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.