Apple ला जोरदार झटका! iPhone मधून काढावं लागणार महत्वाचं फिचर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 12:57 PM2022-06-09T12:57:28+5:302022-06-09T12:57:37+5:30

EU म्हणजे युरोपीय यूनियननं सर्व स्मार्टफोनमध्ये टाइप-सी चार्जिंग पोर्ट बंधनकारक केलं आहे. त्यामुळे आता iPhone मध्ये देखील अँड्रॉइडमधील Type-C पोर्ट मिळू शकतो.  

eu law makes usb c mandatory for all phones Apple iphone with usb type c charging port   | Apple ला जोरदार झटका! iPhone मधून काढावं लागणार महत्वाचं फिचर 

Apple ला जोरदार झटका! iPhone मधून काढावं लागणार महत्वाचं फिचर 

Next

अ‍ॅपल आपल्या इकोसिस्टममध्ये इतरांचा शिरकाव होऊ नये म्हणून खूप काळजी घेते. खासकरून कंपनीच्या आयफोन्समध्ये मिळणारा लायटनींग पोर्टमुळे इतर कंपन्यांना आयफोनसाठी सहजरित्या अ‍ॅक्सेसरीज बनवू शकत नाहीत. दुसरीकडे अँड्रॉइड युजर्स फास्ट चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफर इत्यादी फीचर्सचा अनुभव घेतात. आता हे फीचर्स आयफोनमध्ये देखील मिळणार आहेत. परंतु हे अ‍ॅप्पलच्या इनोवेशनमुळे नव्हे तर युरोपियन युनियनच्या एका निर्णयामुळे होणार आहे.  

EU म्हणजे युरोपीय यूनियननं साल 2024 पर्यंत सर्व कंपन्यांना आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट आणि कॅमेऱ्यांमध्ये एक प्रकारचा चार्जिंग पोर्ट देण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता युरोपियन बाजारात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक फोन, टॅबलेट आणि कॅमेऱ्यात यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट द्यावा लागेल. EU नं गेल्यावर्षी यूएसबी टाइप-सी पोर्ट सर्व डिवाइसेससाठी स्टँडर्ड पोर्ट केला आहे. त्यामुळे अ‍ॅपलला सर्वात मोठा झटका बसला आहे.  

अ‍ॅपलचं असं होणार नुकसान  

अ‍ॅपलनं काही वर्षांपूर्वी कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचं कारण देत आयफोनच्या बॉक्समध्ये चार्जर देणं बंद केलं होतं. तसेच फोनमध्ये जागा नाही म्हणून हेडफोन जॅक देणं देखील बंद केलं होतं. त्यामुळे ग्राहक चार्जर आणि एयरपॉड खरेदी करून कंपनीची तिजोरी भरत होते.  

आता यूएसबी सी आयफोनमध्ये आल्यानंतर इतर कोणत्याही साध्या कंपनीचा चार्जर आयफोन सोबत वापरता येईल. तसेच यूएसबी टाईप सी हेडफोन देखील अनेक कंपन्या विकतात. त्यामुळे या दोन प्रोडक्ट्समधून मिळणार रेव्हेन्यू नक्कीच कमी होईल. तसेच टाईप सी सोबत कम्पॅटिबल असलेल्या अन्य अ‍ॅक्सेसरीज देखील अ‍ॅपलचा बिजनेस प्लॅन बिघडवू शकतात.  

USB टाइप-सी पोर्ट असलेला iPhone कधी येणार?  

यंदा येणाऱ्या iPhone 14 सीरीजची निर्मिती अंतिम टप्पात असल्यामुळे त्यात कोणताही बदल होईल अशी शक्यता नाही. युरोपीय यूनियननं स्मार्टफोन कंपन्यांना 2024 पर्यंतची मदत दिली आहे. त्यामुळे पुढील वर्षी किंवा 2024 मधील येणाऱ्या वाले iPhone सीरीजमध्ये अ‍ॅपल टाइप-सी चार्जिंग पोर्ट देऊ शकते. फक्त युरोपियन बाजारात हा बदल होईल आणि अन्य देशांमध्ये लायटनींग पोर्ट मिळेल की नाही याबाबत देखील आता काही सांगता येणार नाही.  

Web Title: eu law makes usb c mandatory for all phones Apple iphone with usb type c charging port  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल