Reduce Electricity Bill: 24 तास AC, कूलर आणि फॅन चालवताय? या खास Tricks वापरा, अर्ध्यावर येईल बील!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 08:23 AM2022-04-26T08:23:57+5:302022-04-26T08:29:11+5:30

आम्ही आपल्याला वीज बिल कमी करण्याच्या काही खास ट्रिक्स सांगतणार आहोत. या पद्धतींचा वापर करून आपल्याला काही प्रमाणात का होईना, पण दिलासा मिळू शकतो. विशेष म्हणजे, या ट्रिक्सचा वापर केल्यास आपल्याला गर्मीपासून तर दिलासा मिळेलच, पण वीज बिलही कंट्रोलमध्ये राहील. 

even after running cooler and AC for 24 hours electricity bill will come in half follow the tricks and Reduce electricity bill  | Reduce Electricity Bill: 24 तास AC, कूलर आणि फॅन चालवताय? या खास Tricks वापरा, अर्ध्यावर येईल बील!

Reduce Electricity Bill: 24 तास AC, कूलर आणि फॅन चालवताय? या खास Tricks वापरा, अर्ध्यावर येईल बील!

googlenewsNext

उन्हाळ्याची तिव्रता आता चांगलीच जाणवू लागली आहे. तापमान वाढताच घरा-घरांत फॅन, कूलर आणि AC सुरू झाले आहेत. या उपकरणांमुळे गर्मीपासून तर दिलासा मिळतोय, पण, वीजबिलाने खिशाला मोठा फटकाही बसत आहे. यातच आता आम्ही आपल्याला वीजबिल कमी करण्याच्या काही खास ट्रिक्स सांगतणार आहोत. या पद्धतींचा वापर करून आपल्याला काही प्रमाणात का होईना, पण दिलासा मिळू शकतो. विशेष म्हणजे, या ट्रिक्सचा वापर केल्यास आपल्याला गर्मीपासून तर दिलासा मिळेलच, पण वीज बिलही कंट्रोलमध्ये राहील. 

फॅनमध्ये इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरचाच वापर करा - 
उन्हाळ्याच्या दिवसांत फॅन सर्वाधिक चालतात. यामुळे वेळोवेळी फॅनची सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. तसेच फॅनसाठी इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरचाच वापर करयला हवा. तसेच, कंडेंसर आणि बॉल बेअरिंग खराब होत असेल अथवा झाले असेल, तर ते तत्काळ बदला.

कूलरच्या पंख्याचे आणि  पंपचे ऑइलिंग-ग्रिसिंग करा -
भारतात अधिकांश घरांमध्ये कूलरचा वापर केला जातो. कूलरच्या पंख्याचे आणि पंपचे ऑइलिंग-ग्रिसिंग करणे अत्यंत आवश्यक असते. अधिक चालल्याने पंप अधिक वीज ओढतो. यामुळे त्याची वेळोवेळी ऑइलिंग करायला हवी. याशिवाय, कूलरचा पंखा, कंडेंसर आणि रेग्युलेटरवरही लक्ष ठेवायला हवे. इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरनेही बीज कमी खर्च होते.

24 ते 26 डिग्री  दरम्यान सेट करावा AC -
तासं-तास AC सुरू असेल, तर वीजही अधिक लागेल. AC सुरू असतानाच पंखाही सुरू ठेवा. AC चे तापमानही 24 ते 26 डिग्री दरम्यान सोट करा. तसेच, दर 10-15 दिवसानी एअर फिल्टरदेखील चांगल्या पद्धतीने स्वच्छ करा. फिल्टरमध्ये धूळ जमल्याने पूर्णपणे थंडावा मिळत नाही आणि एसी अधिक वेळ सुरू ठेवावा लागतो. यामुळे नाहक अधिक वीज खर्च होते. याच बरोबर AC सुरू असताना खिडक्या आणि दरवाजे बंद असायला हवेत. अन्यथा AC ची अधिक हवा बाहेर जाईल आणि रूम थंड होऊ शकणार नाही.

Web Title: even after running cooler and AC for 24 hours electricity bill will come in half follow the tricks and Reduce electricity bill 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.