प्रत्येकवेळी तुम्हाला मिळेल रेल्वेचं कन्फर्म तिकीट; फक्त वापरा 'ही' टेक्निक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 04:56 PM2022-09-03T16:56:04+5:302022-09-03T16:58:07+5:30
Tatkal Ticket Booking करतेवेळी तुम्हाला सर्वात जास्त लक्ष द्यावे लागेल कारण थोड्या विलंबामुळे तात्काळ तिकीट फुल होतात.
नवी दिल्ली - रेल्वेने प्रवास करणे काही वेळा कठीण होऊन बसते कारण रेल्वेचं कन्फर्म तिकीट न मिळाल्याने अनेकवेळा तुम्हाला अचानक प्लॅन बदलावा लागतो. परंतु आज आम्ही तुम्हाला एक टेक्निक सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्हाला प्रत्येक वेळी ऑनलाइन कन्फर्म ट्रेन तिकीट मिळेल आणि तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. पण हे करण्यापूर्वी तुम्हाला या बातमीतील सर्व गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. ही पद्धत अवलंबल्यानंतर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
IRCTC तात्काळ तिकीट बुकिंग मिळवण्यापूर्वी तुम्हाला तुमचे प्रोफाइल तयार करावे लागेल. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जेव्हा तात्काळ तिकीट बुकिंग सुरू होईल, तेव्हा तुम्हाला सर्व काही पुन्हा भरावे लागणार नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत. सर्व प्रथम, IRCTC मध्ये लॉग इन केल्यानंतर, My Profile पर्यायावर जा. येथे गेल्यावर तुम्हाला मास्टर लिस्ट बनवावी लागेल. मास्टर लिस्ट तयार करण्यासाठी, तुम्हाला सर्व प्रवाशांचे तपशील समाविष्ट करावे लागतील.
Tatkal Ticket Booking करतेवेळी तुम्हाला सर्वात जास्त लक्ष द्यावे लागेल कारण थोड्या विलंबामुळे तात्काळ तिकीट फुल होतात. AC तात्काळ तिकीट बुकिंग सकाळी १० वाजता सुरू होते आणि स्लीपर क्लासचे बुकिंग सकाळी ११ वाजता सुरू होते, त्यामुळे तुम्हाला त्यापूर्वी २ मिनिटे लॉग इन करून बसावे लागेल. आता मास्टर लिस्टमध्ये तुम्हाला सर्व प्रवाशांचे तपशील आगाऊ टाकावे लागतील. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तात्काळ तिकीट उघडताच तुम्हाला फक्त मास्टर्सची यादी निवडावी लागेल.
लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला तुमच्यासमोर शेवटचा पेमेंट पर्याय मिळेल. येथे तुम्हाला UPI, डेबिट/क्रेडिट कार्डचा पर्याय दिला जाईल. तसेच, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही नेट बँकिंगद्वारे सहज पेमेंट करू शकता. परंतु तुम्हाला ही प्रक्रिया फार लवकर पूर्ण करावी लागेल कारण तात्काळ तिकीट बुकिंग लवकरच बंद होईल. त्यामुळे योग्य यूपीआय आयडी आधीच सिलेक्ट करून ठेवा.