Apple ला भारतीय कर्मचाऱ्याने लावला 140 कोटींचा चुना; आता होणार 'इतकी' वर्षे शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 12:36 PM2022-11-03T12:36:34+5:302022-11-03T12:37:56+5:30

Apple : धीरेंद्र प्रसाद हे अनेक दशके ॲपलमध्ये ग्लोबल सर्व्हिस सप्लाय डिपार्टमेंटमध्ये बायर म्हणून काम करत होते. त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.

ex apple employee dhirendra prasad stole over rs 140 crore from company | Apple ला भारतीय कर्मचाऱ्याने लावला 140 कोटींचा चुना; आता होणार 'इतकी' वर्षे शिक्षा!

Apple ला भारतीय कर्मचाऱ्याने लावला 140 कोटींचा चुना; आता होणार 'इतकी' वर्षे शिक्षा!

googlenewsNext

नवी दिल्ली : ॲपलच्या (Apple) भारतीय माजी कर्मचाऱ्याला कंपनीसोबत 17 मिलियन डॉलरपेक्षा (जवळपास 140 कोटी रुपये)  जास्त फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. धीरेंद्र प्रसाद हे अनेक दशके ॲपलमध्ये ग्लोबल सर्व्हिस सप्लाय डिपार्टमेंटमध्ये बायर म्हणून काम करत होते. त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. धीरेंद्र प्रसाद यांनी आपण किकबॅक घेत असल्याची कबुली दिली. याशिवाय, चलन वाढवणे, ॲपलला कधीही न मिळालेल्या सर्व्हिससाठी पैसे घेणे आदी कामे धीरेंद्र प्रसाद करत होते. कॅलिफोर्नियातील एका अमेरिकी अटॉर्नी ऑफिसच्या म्हणण्यानुसार, धीरेंद्र प्रसाद यांनी हा घोटाळा 2011 मध्ये सुरू केला होता आणि 2018 पर्यंत सुरू होता.

या घोटाळ्यात धीरेंद्र प्रसाद ॲपलच्या इन्व्हेंटरीमधून मदरबोर्ड CTrends ला पाठवत होते. ही कंपनी डॉन एम. बेकर या सह-कारस्थानाद्वारे चालवली जात होती. दरम्यान धीरेंद्र प्रसाद यांनी आधीच फसवणुकीमध्ये सहभागी असल्याची कबुली दिली होती. बेकर मदरबोर्डच्या कंपोनेंटपासून हार्वेस्ट करत होते. त्यानंतर बेकर या कंपोनेंट्सला परत ॲपलला परत पाठवत होते. यासाठी CTrends हे इनव्हॉइस फाईल करत होते. धीरेंद्र प्रसाद त्याच्या पेमेंटची व्यवस्था करत होते. शेवटी, ॲपलला आपल्या कंपोनेंट्ससाठी पेमेंट करावे लागत होते. या घोटाळ्यातून मिळालेली रक्कम धीरेंद्र प्रसाद वाटप करत होते.

याचबरोबर, ॲपलमध्ये घोटाळा करण्यासोबतच धीरेंद्र प्रसाद यांनी कर फसवणुकीत सामील असल्याची कबुलीही दिली. ते रॉबर्ट गॅरी हॅन्सनकडून (या फसवणुकीच्या योजनांमध्ये भाग घेतल्याचे कबूल करणारा दुसरा सहकारी) कर्जदारांना थेट पैसे देण्यास सांगत होते. बेकरची बेकायदेशीर पेमेंट लपवण्यासाठी बनावट कंपनीने CTrends ला बनावट इनव्हॉइस पाठवण्याची व्यवस्था केली. अमेरिकी अटॉर्नी कार्यालयाने सांगितले की, यामुळे बेकर अयोग्य कर कपातीमुळे लाखो डॉलर्सचा दावा करत होते.

दरम्यान, धीरेंद्र प्रसाद यांना मार्चमध्ये शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. त्यांना मेल फसवणूक आणि वायर फसवणूक करण्याच्या कटाच्या एका प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त 20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा आहे. धीरेंद्र प्रसाद यांना युनायटेड स्टेट्सची फसवणूक करण्याचा कट रचल्याबद्दलही दोषी ठरविण्यात आले आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. दुसरीकडे, धीरेंद्र प्रसाद यांनी घोटाळ्यातून कमावलेले 5 मिलियन डॉलर्स देण्याची ऑफर दिली आहे. यामध्ये रिअल इस्टेट मालमत्तांचाही समावेश आहे.

Web Title: ex apple employee dhirendra prasad stole over rs 140 crore from company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.