भारीच! आता चक्क मोबाईल करणार निकृष्ट दर्जाच्या पदार्थाची खातरजमा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 09:58 PM2019-08-24T21:58:14+5:302019-08-24T22:08:00+5:30
एकाद्या पदार्थाची एक्सपायरी दिनांक संपत आली असेल तर अनेकदा ते पदार्थ फेकून दिले जातात.
लंडन: आपण नेहमीच बंद असलेले पदार्थ एक्सपायरी दिनांक पाहून वापरत असतो. तसेच एकाद्या पदार्थाची एक्सपायरी दिनांक संपत आली असेल तर अनेकदा ते पदार्थ फेकून दिले जातात. जेवण किंवा एखादे पदार्थ खराब झाले की नाही हे आपण त्या पदार्थाचे वास घेऊन ठरवत असतो. मात्र आता वास घेण्याची गरज पडणार नाही, कारण एखादा पदार्थ खराब झाला की नाही हे आता एक सेन्सर ओळखणार आहे.
लंडनमधील इम्पीरियल कॉलेजने तयार केलेल्या सेन्सरमुळे खाद्यपदार्थांना खराब करणाऱ्या अमोनिया आणि ट्रायमिथायलामाइनचे प्रमाण समजते. यामुळं पदार्थ खराब झाला आहे की नाही हे समजतं. तसेच हे सेन्सर इको फ्रेंडली असून स्मार्टफोनला जोडून पॅकेज फूड खराब झाले आहे की नाही हे पाहता येईल. त्याचप्रमाणे हा सेन्सर पेपरवर आधारित असल्याने याला इलेक्ट्रिकल गॅस सेन्सर असं नाव देण्यात आलं आहे.
संशोधकांनी म्हटलं आहे की, या सेन्सरमुळे पॅकेज फूडवर एक्स्पायरी डेट लावण्याची गरज नाही. कारण हे सेन्सर लावल्यास तुम्हाला त्या पदार्थाची अचूक माहीती मिळणार आहे. तसेच डॉ. फिरात गुडेर यांनी सांगितलं की, हा एकमेव सेन्सर आहे जो व्यावसायिक स्तरावर वापरता येईल. याची किंमत फक्त दीड रुपया असल्यानं वस्तुच्या किंमतीतही फारसा फरक पडणार नाही.