अवघ्या ३० रुपयांत 'ही' कंपनी देतेय ६ OTT सब्सक्रिप्शन; जाणून घ्या जबरदस्त ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 03:12 PM2022-11-22T15:12:30+5:302022-11-22T15:17:53+5:30

कंपनीचा बेस प्लॅन ३० रुपयांपासून सुरू होतो. म्हणजेच तुम्हाला ३० रुपयांमध्ये OTT सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

Excitel company offers 6 OTT subscriptions for just Rs 30; Know the great offer | अवघ्या ३० रुपयांत 'ही' कंपनी देतेय ६ OTT सब्सक्रिप्शन; जाणून घ्या जबरदस्त ऑफर

अवघ्या ३० रुपयांत 'ही' कंपनी देतेय ६ OTT सब्सक्रिप्शन; जाणून घ्या जबरदस्त ऑफर

googlenewsNext

नवी दिल्ली - आजकालच्या जगात केबलसोबत आता OTT फ्लॅटफॉर्मची जोरदार हवा आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांकडून ब्रॉडबँड प्लॅन OTT सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. काही कंपन्यांनी रिचार्जच्या एकत्रित प्लॅनमधून तर काही अतिरिक्त शुल्क भरून OTT सब्सक्रिप्शन ऑफर देत आहेत. अशीच एक ऑफर Excitel कंपनीनं ग्राहकांसाठी आणली आहे. या ऑफरमध्ये अवघ्या ३० रुपयांत ग्राहकांना OTT सब्सक्रिप्शन मिळणार आहे. 

Excitel या OTT प्लॅटफॉर्मवर रिचार्ज प्लॅनसह सबस्क्रिप्शन एकत्रित देत नाही. कंपनी 300Mbps आणि 400Mbps च्या स्पीड प्लॅनसह OTT पॅक ऑफर करत आहे. कंपनीच्या मते ते ८,५०,००० ग्राहकांशी जोडलेले आहेत आणि वेगाने त्यांचा विस्तार होत आहे. या ऑफर्सची माहिती जाणून घेऊया. 

Excitel OTT पॅक काय आहे?
कंपनीचा बेस प्लॅन ३० रुपयांपासून सुरू होतो. म्हणजेच तुम्हाला ३० रुपयांमध्ये OTT सबस्क्रिप्शन देखील मिळेल. याशिवाय ग्राहकांना ६० रुपये, १०० रुपये आणि २०० रुपयांमध्ये OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळते. तुम्हाला या सर्व प्लॅनचा लाभ फक्त हाय-स्पीड इंटरनेट प्लॅनसह मिळेल.

३० रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना EpicON, ShemarooMe, Hungama Play, Hungama Music, ALT Balaji आणि Play box TV चे सबस्क्रिप्शन मिळत आहे. म्हणजेच, ३० रुपयांच्या मासिक खर्चात, तुम्हाला ६ प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन मिळेल. ६० रुपयांच्या मासिक रिचार्जमध्ये तुम्हाला Zee5, Sony LIV आणि Play BOX TV चे सबस्क्रिप्शन मिळेल.

१०० आणि २०० रुपयांमध्ये काय मिळेल?
१०० रुपयांच्या OTT प्लॅनमध्ये ग्राहकांना ZEE5, Sony LIV, EpicON, ShemarooMe, Hungama Play, Hungama Music, ALT बालाजी आणि Play Box TV सब्सक्रिप्शन मिळेल. त्याच वेळी, २०० रुपयांच्या प्लॅनमध्ये, ग्राहकांना ZEE5, Sony LIV, Disney + Hotstar, EpicON, ShemarooMe, Hungama Play, Hungama Music, ALT बालाजी आणि Play Box TV सबस्क्रिप्शन मिळेल.

सर्व प्लॅन्सच्या किमती जीएसटी शुल्काशिवाय आहेत. त्यांचा फायदा फक्त हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शन असलेल्या ग्राहकांनाच मिळेल. तुम्ही १००Mbps किंवा २००Mbps चा प्लान वापरत असाल तर तुम्हाला या OTT पॅकचा लाभ मिळणार नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: Excitel company offers 6 OTT subscriptions for just Rs 30; Know the great offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.