महागड्या स्मार्टफाेनची भारतीयांना भुरळ, प्रीमियम सेगमेंटमध्ये विक्री वाढली; बजेट फाेन्सकडे पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 09:35 AM2022-11-07T09:35:30+5:302022-11-07T09:35:48+5:30
देशात स्मार्टफाेनची विक्री जाेरात हाेत आहे. त्यातही प्रीमियम स्मार्टफाेनच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.
नवी दिल्ली :
देशात स्मार्टफाेनची विक्री जाेरात हाेत आहे. त्यातही प्रीमियम स्मार्टफाेनच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीतील विक्रीतून ही बाब अधाेरेखित झाली आहे. ३० हजार रुपयांहून अधिक किमतीच्या स्मार्टफाेन्सचा एकूण विक्रीतील वाटा १२ टक्के हाेता. मात्र, एकूण स्मार्टफाेनच्या विक्रीत या तिमाहीत ११ टक्के घट नाेंदविण्यात आली आहे.
१० हजारांहून कमी किमतीच्या स्मार्टफाेनची विक्री घटली
२७% ३१%
एकूण वाटा वाटा
२०२२ मध्ये २०२१ मध्ये
५जीची चाहूल लागल्यामुळे लाेकांची ५जी फाेनला पसंती
३१% वाढ ३२%
५जी स्मार्टफाेनच्या वाटा एकूण विक्रीत विक्रीत
- ३ पैकी १ स्मार्टफाेन ५जी
४५ लाख स्मार्टफाेनची एकूण विक्री जुलै-सप्टेंबर तिमाहीत
- एन्ट्री आणि बजट स्मार्टफाेन सेगमेंटमध्ये मागणी घटली
- दिवाळीनंतर विक्रीत आणखी घट हाेण्याची शक्यता