ट्विटरच्या कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टीवर मस्क यांचं स्पष्टीकरण, म्हणाले...पर्यायच नव्हता!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 06:07 AM2022-11-06T06:07:24+5:302022-11-06T06:07:56+5:30

ट्विटरचे नवे मालक इलाॅन मस्क यांनी कंपनीतून माेठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे.

Explanation of Musk on the dismissal of Twitter employees says there was no choice | ट्विटरच्या कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टीवर मस्क यांचं स्पष्टीकरण, म्हणाले...पर्यायच नव्हता!

ट्विटरच्या कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टीवर मस्क यांचं स्पष्टीकरण, म्हणाले...पर्यायच नव्हता!

Next

न्यूयाॅर्क :

ट्विटरचे नवे मालक इलाॅन मस्क यांनी कंपनीतून माेठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. भारतातूनही बहुसंख्य कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. यावरून जाेरदार टीका हाेत आहे. मात्र, कंपनीला दरराेज लाखाे डाॅलर्सचा ताेटा हाेत असल्यामुळे पर्याय नव्हता, असे मस्क यांनी स्पष्ट केले आहे. मस्क यांनी ट्विट करून याबाबत कंपनीतील कर्मचारी कपातीबाबत भूमिका मांडली. 

भारतात सुमारे २०० हून अधिक कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश जणांना घरी बसविले आहे. तसेच भारतातील कर्मचाऱ्यांना किती सेवरंस पॅकेज दिले, याबाबतही नेमकी माहिती दिलेली नाही. 

कर्मचाऱ्यांना तीन प्रकारचे ईमेल
ज्यांना काढलेले नाही अशांना सांगितले की, कर्मचारी कपातीदरम्यान तुमचा राेजगार प्रभावित झालेला नाही. पुढील आठवड्यात तुम्हाला माहिती देण्यासारखे आमच्याकडे बरेच काही राहणार आहे.

ज्यांचे भवितव्य अधांतरी आहे अशांना ऑफिशियल आयडीवर मेल पाठविण्यात आला आहे. तुमच्या भूमिकेला पाेटेंशियल इम्पॅक्टेड म्हणून वेगळे केले आहे. तुम्ही काेणत्या देशात राहता, यावर पुढील निर्णय अवलंबून असेल. लवकरच अधिक माहिती तुम्हाला देऊ.
ज्यांना काढण्यात आले आहे त्यांना याबाबत कळविण्यात आले असून त्यांना ट्विटरच्या सिस्टीममधून काढण्यात आले आहे.

७,५०० जगभरात कंपनीचे कर्मचारी आहेत. त्यापैकी 

३,७३८ कर्मचाऱ्यांना काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भोजपुरी, हिंदीत ट्विट करणारे अकाउंट सस्पेंड
ब्लू टीकसाठी ८ डॉलर शुल्क आकारण्याबाबत मस्क यांच्या नावानेच शनिवारी अचानक हिंदी आणि भोजपुरी भाषेत ट्विट व्हायला लागल्याने एकच गोंधळ उडाला होता. काही आयएएस अधिकाऱ्यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिल्याने मस्क हेच हिंदीत ट्विट करीत असल्याचा समज कारण अकाउंटला ‘ब्लू टीक’ही होते; पण नंतर मेलबर्नमधील ला ट्रोब विद्यापीठातील अमेरिकन-ऑस्ट्रेलियन हिंदी प्राध्यापक इयान वूलफोर्ड यांनी त्यांचे ट्विटर नाव बदलून ‘इलॉन मस्क’ केल्याचे समोर आले. ट्विटरने ते अकाउंट सस्पेंड केले.

Web Title: Explanation of Musk on the dismissal of Twitter employees says there was no choice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.