लावाचा धमाका; मोबाइल न आवडल्यास पैसे परत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 04:22 AM2017-10-07T04:22:50+5:302017-10-07T04:22:59+5:30
कोणत्याही कारणाने मोबाइल आवडला नाही तर पैसे परत देऊ, अशी घोषणा करत लावा इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीने झेड सीरिजचे नवे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत.
नवी दिल्ली : कोणत्याही कारणाने मोबाइल आवडला नाही तर पैसे परत देऊ, अशी घोषणा करत लावा इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीने झेड सीरिजचे नवे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत.
लावाने झेड६०, झेड७०, झेड८० आणि झेड९० हे चार स्मार्ट दाखल केले असून, त्यात अत्याधुनिक कॅमेरे वापरण्यात आले आहेत.
मोबाइल उद्योग क्षेत्रात धमाका करणाºया ‘मनी बॅक चॅलेंज’ योजनेबद्दल माहिती देताना लावा इंटरनॅशनलचे उत्पादन प्रमुख गौरव निगम म्हणाले की, या फोनची निर्मिती येथेच करण्यात आली आहे. गेली आठ वर्षे यासंदर्भात काम सुरू होते. या फोनचा दर्जा एवढा चांगला आहे की आम्ही ग्राहकांसाठी मोबाइल आवडला नाही, तर पैसे परत करण्याचे चॅलेंज निर्माण केले आहे.
झेड सीरिजच्या फोनमध्ये मायक्रोसॉफ्ट सॉफ्टकी कीबोर्ड देण्यात आलेला आहे आणि त्यात अनेक भाषांमध्ये टाइप करण्याची सोय आहे. हे फोन अॅण्ड्रॉइड ७.० नॉगट आॅपरेटिंग सिस्टिमवर चालणारे आहेत.
झेड सीरिजचे नवे स्मार्टफोन लाँच करताना लावा इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी सुनील रैना आणि स्मार्टफोन प्रमुख दीपक महाजन. मोबाइलमध्ये संशोधन आणि विकास सुरू करून लावा कंपनीने भारतीय मोबाइल उत्पादन क्षेत्रात नवे क्षितिज गाठले आहे. यासाठी लाव्हाचे ७००हून अधिक संशोधक अविरत कार्यरत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.