फेस डान्स चॅलेंज अ‍ॅपची सोशल मीडियात धमाल

By शेखर पाटील | Published: August 23, 2017 11:22 AM2017-08-23T11:22:35+5:302017-08-23T11:23:04+5:30

साराह अ‍ॅपनंतर आता फेस डान्स चॅलेंज अ‍ॅप हे लोकप्रिय झाले असून यात विविध इमोजींच्या आकाराचा चेहरा करण्याचे आव्हान देण्यात आले असून याचे धमाल व्हिडीओज व्हायरल होत आहेत.

face dance popular on social media | फेस डान्स चॅलेंज अ‍ॅपची सोशल मीडियात धमाल

फेस डान्स चॅलेंज अ‍ॅपची सोशल मीडियात धमाल

Next

फेस डान्स चॅलेंजअ‍ॅप हे विशेष करून आशियाई राष्ट्रांमध्ये तुफान लोकप्रिय झाल्याचे दिसून येत आहे. व्हिएतनाममधील डिफचॅट गेम स्टुडिओ या कंपनीने हे अ‍ॅप विकसित केले आहे. फेशियल रेकग्नेशन या तंत्रज्ञानावर आधारित असणारे हे अ‍ॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्टॉल करून उघडल्यानंतर आपल्याला हवा तो संगीताचा ट्रॅक निवडण्याचे सांगण्यात येते. यानंतर संगीत सुरू होताच स्मार्टफोनच्या डिस्प्लेवर विविध इमोजी दिसू लागतात. या इमोजीच्या आकारांचे चेहरा त्या युजरला बनवायचा असतो. तो यानुसार चेहरा बनवतो. अर्थात तो किती उत्तमरित्या चेहरा बनवू शकतो? यावरून त्याला गुण प्रदान केले जातात. विशेष म्हणजे याचा तयार करण्यात आलेला व्हिडीओ हा सोशल मीडियात शेअर करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. यातून आपल्या मित्रांना हे चॅलेंज पूर्ण करण्याचे आव्हानदेखील देता येते. हे अ‍ॅप अँड्रॉइड (https://play.google.com/store/apps/details?id=com.diffcat.facedance2&hl=en) आणि आयओएस (https://itunes.apple.com/th/app/facedance-challenge/id1253690514?mt=8) या दोन्ही ऑपरेटींग सिस्टीम्ससाठी प्रदान करण्यात आले आहे.
काही दिवसातच फेस डान्स चॅलेंज हे अ‍ॅप तुफान लोकप्रिय बनले असून याचे सात लाखांपेक्षा जास्त डाऊनलोड झाले आहेत. विशेष करून व्हिएतनाम, फिलीपाईन्स, कंबोडिया आदी राष्ट्रांमध्ये याच्या चाहत्यांचा वर्ग निर्माण झाला आहे. ही मंडळी चित्रविचीत्र चेहर्‍यांच्या या अनोख्या चॅलेंजला पूर्ण करतांनाचे व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. याचा ट्विटरवर #FaceDanceChallenge हा हॅशटॅग लोकप्रिय झाला आहे.

Web Title: face dance popular on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.