फेसबुकवर द्वेष पसरवल्याचा केंद्राचा आरोप, कंपनीकडून मागितली अल्गोरिदम आणि रिस्पॉन्सची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 04:19 PM2021-10-28T16:19:22+5:302021-10-28T16:19:49+5:30

केंद्र सरकारनं फेसबुकला (Facebook) पत्र लिहून कंपनीद्वारे वापरले जाणारे अग्लोरिदम आणि इतर प्रक्रियेची सविस्तर माहिती मागितली आहे. भारत फेसबुकची ...

Facebook accused of spreading hate content central government asked Facebook company for details of algorithms response | फेसबुकवर द्वेष पसरवल्याचा केंद्राचा आरोप, कंपनीकडून मागितली अल्गोरिदम आणि रिस्पॉन्सची माहिती

फेसबुकवर द्वेष पसरवल्याचा केंद्राचा आरोप, कंपनीकडून मागितली अल्गोरिदम आणि रिस्पॉन्सची माहिती

Next

केंद्र सरकारनंफेसबुकला (Facebook) पत्र लिहून कंपनीद्वारे वापरले जाणारे अग्लोरिदम आणि इतर प्रक्रियेची सविस्तर माहिती मागितली आहे. भारत फेसबुकची सर्वात मोठी ग्राहकपेठ असूनही खोटी माहिती, द्वेषयुक्त भाषण आणि हिंसेवर सेलिब्रेशन करणारे व्हिडिओ अशा पद्धतीच्या साम्रगीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लिहिलेलं हे पत्र महत्त्वाचं ठरणार आहे. 

अमेरिकी माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार फेसबुकवर असे अनेक ग्रप्स आणि पेज आहेत की जे भ्रामक, द्वेषयुक्त आणि मुस्लिम विरोधी माहितीनं भरलेले असल्याचं सोशल मीडिया संशोधकांनी अधोरेखित केलं आहे. इलेक्ट्रॉनिक आणि सूचना मंत्रालयानं फेसबुकला पत्र लिहून कंपनीकडून वापरलेलं जाणारं अग्लोरिदम आणि प्रक्रियेबाबतची माहिती मागितली आहे. याशिवाय युझर्सच्या सुरक्षेसाठी उचलण्यात आलेल्या पावलांची माहितीही केंद्रानं फेसबुकडे मागितली आहे. दरम्यान, फेसबुकनं याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास विरोध केला आहे. 

भारत सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशात ५३ कोटींहून अधिक लोक व्हॉट्सअॅप, ४१ कोटी लोक फेसबुक आणि २१ कोटी लोक इन्स्टाग्रामचा वापर करत आहेत. दरम्यान या वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारनं नवे आयटी नियम लागू करत ट्विटर आणि फेसबुकसह अनेक बड्या टेक्नोलॉजी कंपन्यांना अधिक जबाबदारीनं वागण्यासाठीची तरतूद केली आहे. 

अल्गोरिदमची माहिती घेण्यासाठी २०१९ मध्ये तयार करण्यात आलेलं 'टेस्ट अकाऊंट'
ब्लूमबर्ग आणि इतर अमेरिकी माध्यमांच्या समूहांनी मिळवलेल्या कागदपत्रांनुसार फेसबुकनं २०१९ साली अग्लोरिदमचा प्रभाव समजून घेण्यासाठी एक टेस्ट अकाऊंटची निर्मिती केली होती. ज्यात भारतात युझर्सद्वारे पाहण्यात येणाऱ्या माहितीची चाचणी केली गेली. न्यूयॉर्क टाइम्सनं देलेल्या वृत्तानुसार फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रकाशित एका आंतरिक रिपोर्टमध्ये अकाऊंट तयार केलेल्या संशोधकानं म्हटलंय की, "टेस्ट यूझरच्या न्यूज फीडमध्ये गेल्या तीन आठवड्यांमध्ये मृत व्यक्तींचे फोटो सर्वाधिक वेळा पाहिलं गेले. हे असं मी माझ्या आजवरच्या आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं"

Web Title: Facebook accused of spreading hate content central government asked Facebook company for details of algorithms response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.