फेसबुकने लाँच केले Live Audio Rooms आणि Podcasts; या युजर्ससाठी उपलब्ध झाले फिचर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 06:51 PM2021-06-22T18:51:15+5:302021-06-22T18:52:42+5:30

Facebook ने Live Audio Rooms चे फिचर लाँच केले आहे. त्याचबरोबर Podcasts देखील रोलआउट करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.  

Facebook becomes clubhouse s biggest challenger as it launches live audio rooms facebook podcasts coming next  | फेसबुकने लाँच केले Live Audio Rooms आणि Podcasts; या युजर्ससाठी उपलब्ध झाले फिचर

फेसबुकने लाँच केले Live Audio Rooms आणि Podcasts; या युजर्ससाठी उपलब्ध झाले फिचर

Next

ऑडिओ सोशल मीडियाच्या श्रेणीत आता Facebook ने देखील प्रवेश केला आहे. कंपनीने कंपनीने Live Audio Rooms आणि Podcasts रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. हे फिचर सध्या फक्त यूएसमधील iOS डिवाइससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. सध्यातरी फक्त पब्लिक फिगर्स आणि निवडक फेसबुक ग्रुप्सना लाइव ऑडियो रूम बनवण्याची परवानगी देण्यात आली आहे.  

अमेरिकेतील श्रोत्यांसाठी काही निवडक पॉडकास्ट उपलब्ध होतील, अशी कंपनीने एका ब्लॉग पोस्टमधून माहिती दिली आहे. आगामी काही दिवसांत अजून काही पब्लिक फिगर्स आणि ग्रुप्स पर्यंत लाइव ऑडियो रूमचा विस्तार करण्यात येईल. तसेच या फीचर्समध्ये सुधारणा करण्यात येईल.  

पब्लिक फिगर्स आपले मित्र, फॉलोअर्स, वेरीफायड पब्लिक फिगर आणि इतर कोणालाही स्पिकर म्हणून आमंत्रण देऊ शकतात. होस्ट स्पिकर्स लाईव्ह रूममध्ये कधीही लोकांना आमंत्रित करू शकतात. हे लाईव्ह रूम्स न्यूज फीड्समध्ये दिसतील तसेच यांची नोटिफिकेशन देखील पाठवण्यात येईल. ऑडिओ रूम्स आणि पॉडकास्टमध्ये  लिस्नर्स कडे लाईव्ह कॅप्शन्स, रेज अ हॅन्ड असे फीचर्स मिळतील.  

ट्विटर, डिस्कॉर्ड आणि स्पॉटीफाय नंतर आता फेसबुकने ऑडिओ सोशल मीडियामध्ये हात अजमावण्यास सुरुवात केली आहे. LinkedIn देखील लवकरच असे फिचर घेऊन येणार असल्याची बातमी आली आहे.  

Web Title: Facebook becomes clubhouse s biggest challenger as it launches live audio rooms facebook podcasts coming next 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.