फेसबुकचे 'हे' फिचर्स आहेत फायदेशीर, नोकरीपासून हवामानापर्यंतचे मिळणार अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 12:37 PM2018-11-20T12:37:26+5:302018-11-20T12:42:23+5:30

फेसबुक हे संवाद साधण्याचं उत्तम माध्यम असल्याने अनेक जण त्याचा वापर करत असतात. फेसबुकही जास्तीत जास्त युजर्सना आकर्षित करण्यासाठी नवनवीन अपडेट आणत असतं.

facebook best feature you should know | फेसबुकचे 'हे' फिचर्स आहेत फायदेशीर, नोकरीपासून हवामानापर्यंतचे मिळणार अपडेट

फेसबुकचे 'हे' फिचर्स आहेत फायदेशीर, नोकरीपासून हवामानापर्यंतचे मिळणार अपडेट

googlenewsNext
ठळक मुद्देफेसबुक हे संवाद साधण्याचं उत्तम माध्यम असल्याने अनेक जण त्याचा वापर करत असतात. फेसबुकही जास्तीत जास्त युजर्सना आकर्षित करण्यासाठी नवनवीन अपडेट आणत असतं. फेसबुकमध्ये असे अनेक फीचर्स उपलब्ध आहेत ज्याचा खूप फायदा होतो.

नवी दिल्ली - फेसबुक हे संवाद साधण्याचं उत्तम माध्यम असल्याने अनेक जण त्याचा वापर करत असतात. फेसबुकही जास्तीत जास्त युजर्सना आकर्षित करण्यासाठी नवनवीन अपडेट आणत असतं. मात्र फेसबुकमध्ये असे अनेक फीचर्स उपलब्ध आहेत ज्याचा खूप फायदा होतो. हवामानापासून नोकरीपर्यंत प्रत्येक गोष्टीची माहिती देणाऱ्या या फिचर्सबाबत जाणून घेऊया. 

Blood Donations - फेसबुकने काही दिवसांपूर्वीच Blood Donations हे फीचर आणलं आहे. हे अत्यंत उपयोगी फीचर असून एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज असल्यास या फीचरच्या माध्यमातून ब्लड डोनर्सची माहिती मिळते.

Jobs on Facebook - फेसबुकच्या या फिचरचा वापर करून युजर्स आपल्या लोकेशनच्या आसपास नोकरी शोधू शकतात. तसेच तुम्हाला हवी तशी नोकरी शोधण्यास याचा फायदा होतो. फेसबुकच्या या फीचरच्या मदतीने नोकरी शोधणे थोडे सोपे होईल. 

Save Post - फेसबुकवरील Save Post या फीचरच्या माध्यमातून तुम्हाला हवी असलेली लिंक तुम्ही सेव्ह करू शकता. फेसबुकवर एखादी पोस्ट वाचत असताना अथवा व्हिडीओ पाहत असताना अचानक काम आल्यास या फीचरच्या मदतीने पोस्ट सेव्ह करता येते. 

Live Videos - फेसबुकच्या लाईव्ह व्हिडीओ या फीचरच्या माध्यमातून लाईव्ह सुरू असलेले सर्व व्हिडीओ एकाच ठिकाणी पाहता येतात. 

Weather - फेसबुकच्या या फिचरच्या माध्यमातून हवामानाबाबत माहिती मिळते. तसेच या फिचरच्या मदतीने तुम्ही असलेल्या लोकेशनच्या तापमानाची ताजी माहिती मिळते. येणाऱ्या काळात हवामान कसे असणार आहे याबाबतही हे फीचर माहिती देते. 

Web Title: facebook best feature you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.