Facebook Bug: एका झटक्यात झुकरबर्गचेच फॉलोअर्स गायब, अन्य युझर्सनाही मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 10:54 AM2022-10-12T10:54:34+5:302022-10-12T10:55:06+5:30
फेसबुकमधील बगमुळे लाखो लोकांचे फॉलोअर्स रातोरात गायब झाले आहेत.
फेसबुकमधील बगमुळे लाखो लोकांचे फॉलोअर्स रातोरात गायब झाले आहेत. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग देखील यातून सुटलेला नाही. मार्क झुकरबर्गचे केवळ 9,993 फॉलोअर्स उरले आहेत. या फॉलोअर्सची संख्या त्याच्या पेजवर पाहता येईल.
इतर अनेक युझर्सनंदेखील अचानक फॉलोअर्सची संख्या कमी झाल्याबद्दल तक्रार केली आहे. बनावट फॉलोअर्सच्या छाटणीचा हा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मार्क झुकरबर्गचे सर्व फॉलोअर्सही बनावट होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, यानंतर अनेक नेटकऱ्यांनी फेसबुकला ट्रोल केलं. काहींनी मिम्स शेअर करत या प्रकाराची खिल्ली उडवली. झुकरबर्गला कोणत्यातरी ज्योतिषानं अशुभ अंक सांगितला आहे. त्यामुळे एका रात्री त्यानं सर्वांना 9 हजारांच्या आत आणलं असं म्हणत एका युझरनं यावर खिल्ली उडवली.
ये नौ हज़ार का अशुभ अंक किस अंक ज्योतिषी ने बता दिया है जुक्कू को मने एकदम ही समतामूलक समाज की संरचना कर दी है रातों-रात सबको 9000 के अंदर ला पटका 🙄@facebook right now- pic.twitter.com/zpViQpmcv3
— Nazia Khan (@NaeemDrnazia) October 12, 2022
I had over 22,000 Facebook followers yesterday. Today, I only have 9,033 followers. Why did I lose 13,000 followers in one day? #WakandaForever— Oatmeal Joey Arnold (@JoeyArnoldVN) October 12, 2022
@facebook@Meta@MetaNewsroom Post about the sudden decrease in followers on Facebook were seen from many friends. Is this a technical glitch or something else??— Nikhilesh Mishra (Nikhil) (@NikhileshOnline) October 12, 2022
What is the problem in @facebook , everyone's followers are being seen less than millions of followers and many profiles are not opening, what is the problem, Facebook is down.@fbsecurity@facebookapp@Meta#facebookdown— Adnan Waxiri (@Adnan_Wxr) October 12, 2022
मेटाने अलीकडेच हाय-एंड रिॲलिटी हेडसेट सादर केले, जे मार्क झुकरबर्गने त्याच्या फेसबुक पेजवर देखील शेअर केले होते. नवीन हेडसेटला Meta Quest Pro असे नाव देण्यात आले आहे आणि त्याची किंमत 1,500 डॉलर्स म्हणजेच सुमारे 1,23,459 रुपये ठेवण्यात आली आहे. हा हेडसेट चेहऱ्यावरील नैसर्गिक भाव देखील ट्रॅक करेल.