मार्क झुकरबर्ग यांचा मोठा निर्णय, आता फेसबुक करणार नाही 'पॉलिटिकल ग्रुप्स'ची शिफारस 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 02:55 PM2021-01-28T14:55:01+5:302021-01-28T14:55:36+5:30

facebook ceo mark zuckerberg : २०२० च्या शेवटच्या तिमाहीत कंपनीला चांगला नफा मिळाला आहे.

facebook ceo mark zuckerberg said that they will stop recommending political groups permanently | मार्क झुकरबर्ग यांचा मोठा निर्णय, आता फेसबुक करणार नाही 'पॉलिटिकल ग्रुप्स'ची शिफारस 

मार्क झुकरबर्ग यांचा मोठा निर्णय, आता फेसबुक करणार नाही 'पॉलिटिकल ग्रुप्स'ची शिफारस 

Next
ठळक मुद्देकंपनी आता आपल्या न्यूज फीडमध्ये युजर्सद्वारे पाहिले जाणारे राजकीय कंटेट कमी करण्याचा प्लॅन करीत आहे.

नवी दिल्ली : फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Facebook CEO Mark Zuckerberg) यांनी राजकीय ग्रुप्सबाबत मोठी घोषणा केली आहे. फेसबुकवर राजकीय ग्रुप्सची (civic and political groups)  शिफारस केली जाणार नाही, असे फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.  दरम्यान, अमेरिकेच्या निवडणुकीच्या वेळी कंपनीने असा निर्णय घेतला होता. 

२०२० च्या शेवटच्या तिमाहीत कंपनीला चांगला नफा मिळाला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कंपनीने ११.२२ अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. अमेरिकेतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या ऑक्टोबरमध्ये अमेरिकन युजर्संना या ग्रुप्सना शिफारस करण्यापासून रोखण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता. याशिवाय, मार्क झुकरबर्ग म्हणाले की, कंपनी आता आपल्या न्यूज फीडमध्ये युजर्सद्वारे पाहिले जाणारे राजकीय कंटेट कमी करण्याचा प्लॅन करीत आहे.

मार्क झुकरबर्ग म्हणाले, "आम्ही आमच्या कम्युनिटीकडून फीडबॅक घेतला आहे. जो ऐकल्यानंतर असे दिसून आले आहे की, लोक आता पॉलिटिकल कंटेट पाहणे पसंत करत नाहीत. त्यामुळे आम्ही आपल्या सेवेत बदल करण्याचा प्लॅन करत आहेत." दरम्यान, २०२० च्या शेवटच्या तिमाहीत कंपनीचा नफा वाढला आहे. कोरोना संकट काळात लोक घरातच असल्यामुळे फेसबुक राहिल्यामुळे फेसबुक युजर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 

याशिवाय, डिजिटल जाहिरातींमधून मिळणारा महसूलही वाढला आहे. फॅक्टसॅटने केलेल्या सर्वेक्षणात विश्लेषकांनी असे म्हटले आहे की, फेसबुकने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ११.२२ अब्ज डॉलर नफा कमावला, जो मागील वर्षाच्या कालावधीपेक्षा ५३ टक्के जास्त आहे.

१२ टक्के वाढला युजर्स बेस
या कालावधीत जर आपण कंपनीच्या उत्पन्नाबद्दल पाहिले तर ते २२ टक्क्यांनी वाढून सुमारे २८.०७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. याशिवाय, फेसबुकचा मासिक युजर्स बेस १२ टक्क्यांनी वाढून सुमारे २.८ अब्ज झाला आहे. फेसबुकमध्ये २०२०च्या शेवटपर्यंत ५८, ६०४ कर्मचारी होते.

Web Title: facebook ceo mark zuckerberg said that they will stop recommending political groups permanently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.