व्हॅाट्सअॅप व इन्स्टाग्रामचे होणार नामकरण; 'असे' असणार नवीन नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 02:04 PM2019-08-05T14:04:48+5:302019-08-05T14:14:50+5:30
फेसबुक कंपनीने इन्स्टाग्राम व व्हॅाट्सअॅपला एक वर्ष आधीच खरेदी केले होते. परंतू या दोन्हीवर फेसबुकचा उल्लेख केला नव्हता.
मुंबई: फेसबुक इंकने फोटो शेअरिंग इन्स्टाग्राम आणि व्हॅाट्सअॅपमध्ये आपले नाव जोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच इन्स्टाग्राम आणि व्हॅाट्सअॅपचे नवीन नामकरण होणार आहे.
सोशल नेटवर्क फेसबुक कंपनीने इन्स्टाग्राम व व्हॅाट्सअॅपला एक वर्ष आधीच खरेदी केले होते. परंतू या दोन्हीवर फेसबुकचा उल्लेख केला नव्हता. परंतू आता कंपनीचे नाव जोडल्यावर युजर्संना देखील समजेल की व्हॅाट्सअॅप व इन्स्टाग्राम फेसबुकचा भाग आहे.
रिपोर्टनुसार, फेसबुक कंपनीने इन्स्टाग्राम आणि व्हॅाट्सअॅप संबंधीत कर्मचाऱ्यांना देखील याची कल्पना दिली आहे की या दोन्ही अॅप्सला रिब्रॅडींग करण्याची योजना बनविण्यात येत आहे. फेसबुक कंपनीने याबाबत सांगितले की, लवकरच इन्स्टाग्रामचे नाव 'Instagram From Facebook´ आणि व्हॅाट्सअॅपचे 'WhatsApp From Facebook' असे असणार आहे.
Instagram will have a new branding called "Instagram from Facebook pic.twitter.com/deg5X0B1iO
— Jane Manchun Wong (@wongmjane) March 29, 2019
तसेच सध्यातरी फोन आणि टॅबलेटच्या होमस्क्रीनवर जे नाव आहे तेच राहणार आहे. त्याचप्रमाणे जे युजर्स पहिल्यांदा हे अॅप डाऊनलोड करतील त्यांनी मात्र या दोन्ही अॅपचे नाव बदलल्याचे दिसणार आहे.