Facebook साठी नवीन संकट; Meta नाव चोरल्याचा आरोप, होऊ शकते कायदेशीर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 11:19 AM2021-11-08T11:19:40+5:302021-11-08T11:20:20+5:30
Facebook : अमेरिकेतील मेटा कंपनी फेसबुकवर त्यांच्या नावाचे उल्लंघन केल्याबद्दल खटला दाखल करणार आहे.
सॅन फ्रान्सिस्को : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने (Facebook)नुकतेच आपले नाव बदलून मेटा (Meta) ठेवले आहे. मात्र, आता फेसबुकनेमेटा हे नाव चोरल्याचा आरोप होत आहे. शिकागो येथील टेक फर्मच्या मते, त्यांच्या कंपनीचे नाव मेटा आहे, जी फेसबुकने विकत घेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, ज्यावेळी फेसबुक कंपनी विकत घेण्यास अयशस्वी ठरली, त्यावेळी फेसबुककडून मेटा हे नाव चोरले गेले. आता फेसबुकच्याविरोधात कंपनी कोर्टात जाणार आहे. मेटा कंपनीच्या म्हणण्यानुसार, फेसबुकने केवळ त्याचे नावच चोरले नाही तर फेसबुकने मेटा नावाचे रि-ब्रँडिंग करून त्यांची उपजीविका धोक्यात आणली आहे.
फेसबुकवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय
मेटा कंपनीचे संस्थापक Nate Skulic यांनी सांगितले की, फेसबुक त्यांची कंपनी विकत घेण्यात अपयशी ठरली आहे. यानंतर, फेसबुकने 28 ऑक्टोबर रोजी मीडियाच्या आधारे आमच्या कंपनीचे मेटा नाव मिटवण्याचा प्रयत्न केला आणि फेसबुकला मेटा म्हणून रि-ब्रँड केले.
फेसबुकने ट्रेडमार्कचे उल्लंघन करण्याचा आणि स्वतःला मेटा म्हणण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, हे Nate Skulic यांनी जाहीर पत्रात म्हटले आहे. तसेच, मेटा कंपनीने फेसबुकवर आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
फेसबुकवर खटला दाखल होऊ शकतो
फेसबुक आणि त्याचे अधिकारी फसवणूक करणारे आहेत, असा आरोपही Nate Skulic यांनी केला आहे. तसेच, Nate Skulic म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांपासून फेसबुकचे वकील आमचे नाव त्यांना विकण्यासाठी आम्हाला त्रास देत आहेत. आम्ही अनेक कारणास्तव त्यांची ऑफर नाकारली, असे Nate Skulic म्हणाले.
तसेच, अमेरिकेतील मेटा कंपनी फेसबुकवर त्यांच्या नावाचे उल्लंघन केल्याबद्दल खटला दाखल करणार आहे. दरम्यान, या प्रकरणी फेसबुककडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी गेल्या महिन्यात घोषणा केली होती की, फेसबुक कंपनीचे नवीन नाव मेटा असेल.