निवडणुकांच्या तोंडावर शंभरावर फेसबुक, इन्स्टावरील अकाऊंट ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 10:23 AM2018-11-06T10:23:33+5:302018-11-06T10:23:50+5:30
निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप असणाऱ्या फेसबुकने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये मध्यावधी निवडणुकांचे जोरदार वारे वाहू लागले असून दोन वर्षांपूर्वी निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप असणाऱ्या फेसबुकने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीपूर्वी आक्षेपार्ह वाटणारी 115 खाती फेसबुकने ब्लॉक केली आहेत.
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीमध्ये सोशल प्रचारावेळी गैरवापर झाल्याचा आरोप फेसबुकवर ठेवण्यात आले होते. यावर सुनावणीही सुरु आहे. त्यातच नुकतेच 9 लाखांवर खाती हॅक झाली होती. भारतातही येत्या काळात निवडणुका येऊ घातल्या आहेत. यामुळे अमेरिकेसह भारतातील सरकारांना आश्वस्त करण्यासाठी फेसबुकने पहिले पाऊल उचलले आहे.
Facebook blocks some 30 accounts and 85 accounts on Instagram over concerns they may be linked to foreign entities aimed at interfering in US midterm elections: AFP news agency pic.twitter.com/IR25roYXk4
— ANI (@ANI) November 6, 2018
फेसबुकन आज फेसबुकवरील 30 आणि इन्स्टाग्रामवरील 85 खाती ब्लॉक केली आहेत. ही खाती परदेशातील काहीं जणांशी संबंधीत असल्याचे वृत्त एएफपीने दिले आहे.