युजर्सच्या मृत्यूनंतर Facebook-Instagram अकाऊंटचं नेमकं काय होतं, तुम्हाला माहितीय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 06:17 PM2022-12-30T18:17:19+5:302022-12-30T18:19:18+5:30
Facebook , Instagram किंवा WhatsApp प्रत्येकजण वेगवेगळे इन्स्टंट मेसेजिंग App वापरतं. यामुळे लोक एकमेकांशी नेहमी जोडलेले राहतात.
इंटरनेट आता जगण्याचा एक अविभाज्य भाग झालं आहे. तुम्ही इंटरनेट वापरत नसाल तर, जगापासून दूर आहात असेच मानले जाते. इंटरनेट आज सर्वांची गरज बनली असून इंटरनेटद्वारे जगभरात काय घडत आहे याची माहिती मिळत असते. अभ्यासापासून मनोरंजन आणि व्यवसायापर्यंत सर्वच इंटरनेमुळे सोपे झाले आहे. आज जवळ-जवळ प्रत्येक व्यक्तीच्या फोनमध्ये इंटरनेट आहे आणि अनेक Social Media हँडल आहेत. Facebook , Instagram किंवा WhatsApp प्रत्येकजण वेगवेगळे इन्स्टंट मेसेजिंग App वापरतं. यामुळे लोक एकमेकांशी नेहमी जोडलेले राहतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटचे काय होते? किंवा अचानक एखाद्याचा कार अपघातात किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याचे फेसबुक-इन्स्टाग्राम वगैरे अकाऊंट कोण चालवणार? याबाबत जाणून घेऊया...
सर्च इंजिन Google प्रमाणेच फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही मृत्यूनंतर अकाऊंट हटविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मृत्यूनंतर, व्यक्तीचे अकाऊंट, प्रोफाइल, पोस्ट इत्यादी सर्व माहिती सर्व्हरवरून हटविली जाते. दुसरीकडे, जर युजरला हे नको असेल तर तो मेमोरियल म्हणून अकाऊंट देखील हटवू शकतो आणि दुसरे कोणीतरी ते मॅनेज करू शकते. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे खाते कोणी चालवू नये असे वाटत असेल, तर फेसबुक-इन्स्टाग्रामच ते अकाऊंट हटवते. मात्र यासाठी युजरला आधी काही सेटिंग्ज कराव्या लागतात.
असं डिलीट होईल अकाऊंट
जर तुम्हाला तुमचे खाते मेमोरियल म्हणून ठेवायचे नसेल आणि ते कायमचे हटवायचे असेल तर, तुम्हाला एक सेटिंग करावी लागेल. मृत्यूनंतर दुसऱ्या व्यक्तीला फेसबुकला सांगावे लागेल की, युजरचा मृत्यू झाला आहे. यानंतर कंपनी त्याचे खाते सर्व्हरवरून कन्फर्म करून डिलीट करते . मात्र, यासाठी खाते मालकाला एक सेटिंग करावी लागेल. युजरला आधी सेटिंगमध्ये जाऊन 'डिलीट आफ्टर डेथ' हा पर्याय निवडावा लागेल
यासाठी तुम्हाला Settings and Privacy सिलेक्ट करावे लागेल आणि नंतर Access and Control मधून Memorialisation Settings वर जावे लागेल. येथे तुम्हाला डिलीट आफ्टर डेथचा पर्याय मिळेल, जो तुम्हाला निवडून ठेवावा लागेल. युजरला त्याचे अकाऊंट हटवायचे नसेल तर ते मेमोरियल म्हणून देखील ठेवू शकता. यासाठी तुम्हाला फेसबुक App मधील सेटिंग्ज आणि प्रायव्हसीमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला मेमोरिअलायझेशन सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि निवडा लेगसी कॉन्टॅक्ट निवडा, येथे तुम्ही अशी व्यक्ती निवडा, जी तुमच्यानंतर तुमच्या अकाऊंटची काळजी घेईल. तुम्ही तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेली व्यक्तीच निवडू शकता. फेसबुकप्रमाणेच इन्स्टाग्रामची प्रोसेस आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"