पुन्हा ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही? फेसबुकचे नवीन VR Office Space अ‍ॅप झालं लाँच

By सिद्धेश जाधव | Published: August 20, 2021 04:58 PM2021-08-20T16:58:35+5:302021-08-20T17:00:24+5:30

फेसबुकने एक वर्चुअल रियलिटी ऑफिस स्पेस बनवण्यासाठी Horizon Workroom अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने आता ओनलाईन मिटींग्स आणि व्हिडीओ कॉन्फरन्स आखून मजेशीर होतील.  

Facebook launched new vr office space app horizon workroom step to go future metaverse  | पुन्हा ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही? फेसबुकचे नवीन VR Office Space अ‍ॅप झालं लाँच

पुन्हा ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही? फेसबुकचे नवीन VR Office Space अ‍ॅप झालं लाँच

Next

Facebook ने एक नवीन VR (Virtual Reality) Office Space अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने घर बसल्या ऑफिसमध्ये जाऊन कॉन्फरन्स केल्याचा अनुभव मिळेल. सध्या या अ‍ॅप्लिकेशनची चाचणी सुरु आहे. व्हिडीओ कॉन्फरन्स आणि ऑनलाईन मिटींग्स इंटरेक्टिव आणि परिणामकारक बनवण्यासाठी फेसबुकने हे नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. वर्चुअल रियलिटी ऑफिस स्पेस निर्माण करण्यासाठी Horizon Workroom अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.  

Horizon Workroom आहे तरी काय? 

फेसबुक Oculus च्या मदतीने हे नवीन प्लॅटफॉर्म डेवलप करत आहे आणि घरातून काम होणाऱ्या कमला स्टॅंडर्ड स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे. संवाद साधण्याची ही नवीन पद्धत लवकरच ‘Metaverse’ नावाने भविष्यातील ऑफिस स्पेस बनू शकते. Horizon Workroom अ‍ॅपचा उपयोग करण्यासाठी युजर्सना आपल्या अवतार व्हर्जनमध्ये मीटिंग होस्ट करावी लागेल. यासाठी Oculus Quest 2 हेडसेटचा वापर करावा लागेल. फेसबुकने Oculusच्या माध्यमातून वर्चुअल रियलिटी सेगमेंटमध्ये एंट्री घेतली आहे. 

हे नवीन अ‍ॅप मोफत डाउनलोडसाठी उपलब्ध होईल. परंतु या अ‍ॅपचा वापर करण्यातही हार्डवेयर Oculus Quest 2 हेडसेट विकत घ्यावा लागेल, ज्याची किंमत $300 (जवळपास 22,000 रुपये) आहे. या नवीन प्लॅटफॉर्म VR मध्ये 16 आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये 50 लोक एकसाथ सामील होऊ शकतात. फेसबुकचे कर्मचारी या नवीन अ‍ॅपचा वापर करतात, असे कंपनीने सांगितले आहे. कंपनीच्या या उपक्रमामुळे घरातून काम करणाऱ्या लोकांना एक वर्चुअल ऑफिस मिळेल.  

Web Title: Facebook launched new vr office space app horizon workroom step to go future metaverse 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.