गेमिंग लव्हर्ससाठी खूशखबर, फेसबुकने लाँच केला Gaming Tab
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 01:01 PM2019-03-20T13:01:18+5:302019-03-20T13:22:23+5:30
फेसबुकने गेमिंग लव्हर्स युजर्ससाठी एक Gaming Tab लाँच केला आहे. फेसबुकच्या मेन नेविगेशन पेजवर युजर्सना आता एक वेगळं सेक्शन दिसणार आहे.
नवी दिल्ली - फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. फेसबुकने यावेळी गेमिंग लव्हर्स युजर्ससाठी एक Gaming Tab लाँच केला आहे. फेसबुकच्या मेन नेविगेशन पेजवर युजर्सना आता एक वेगळं सेक्शन दिसणार आहे. यामुळे युजर्स गेमिंग पेजवर थेट जाऊ शकणार आहेत. गेमिंग पेजवर युजर्सना अनेक इंटरेस्टिंग गेमचे ऑप्शन देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे गेम्स युजर्सना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळता येणार आहेत.
Gaming Tab वर युजर्सना गेम्सचे लोकप्रिय ग्रुप्स फॉलो करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच या नव्या टॅबमध्ये युजर्स आपल्या आवडीने गेम्स निवडून अनेक नवीन कॉन्टॅक्ट शोधू शकतात. रिपोर्टनुसार, युजर्सना या टॅबमध्ये टॉप स्टीमर्स आणि गेम पब्लिशर्सचे व्हिडीओ तसेच इतर गेमिंग गुप्सबाबत अपडेट दिसणार आहेत. सर्व लोकांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी एक वेगळा गेमिंग टॅब लाँच केलं आहे. जगभरात जवळरपास 700 मिलियन म्हणजेच 70 कोटी युजर्स रोज व्हिडीओ गेम खेळतात असा दावा कंपनीने केला आहे.
फेसबुकने हे फीचर रोलआऊट करण्यास सुरुवात केली असून लवकरच हे सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. तसेच गेल्या वर्षीपासून या फीचरवर काम सुरू असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. फेसबुक लवकरच आपल्या अॅन्ड्रॉईड युजर्ससाठी एक नवीन वेगळं गेमिंग अॅप देखील आणणार आहे. सध्या कंपनी या नव्या गेमिंग अॅपवर काम करत आहे. तसेच या नवीन अॅपमध्ये अनेक दमदार फीचर्स असणार आहेत. या नव्या अॅपसाठी फिडबॅकही घेण्यात येत असल्याची माहिती फेसबुकनेच आपल्या ब्लॉगमध्ये दिली आहे.
Play, watch, connect and discover in a new, dedicated Facebook Gaming tab - starting to roll out today. More details in our blog: https://t.co/qSEb8rnZPBpic.twitter.com/fa1Qtk1oCS
— Facebook Gaming (@FacebookGaming) March 14, 2019
फेसबुकवरून व्हॉट्सअॅप, इन्स्टालाही मॅसेज पाठविता येणार...
गुगलच्या ऑर्कुटसारखी फेसबुकची स्थिती होऊ नये म्हणून फेसबुक कंपनी नवनवीन फीचर आणत असतं. आता फेसबुकवरून इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवरही मॅसेज पाठविता येणार आहेत. ही सुविधा व्हॉट्सअॅपवरूनही फेसबुकला मॅसेज पाठविण्यासाठी मिळणार आहे. खरंतर फेसबुक त्याच्या मालकीच्या या तिन्ही प्लॅटफॉर्मला एकमेकांना जोडण्याची तयारी करत आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार ही कल्पना मार्क झुकरबर्ग यांना सुचली आहे. या तिन्ही प्लॅटफॉर्मच्या अॅपचा वापर बदलणार नसून केवळ एकमेकांना क्रॉस प्लॅटफॉर्मवर मॅसेज पाठविता येणार आहेत.
Facebook वर लवकरच येणार Whatsapp सारखं फीचर
Facebook आणि Whatsapp नेहमीच युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतात. Whatsapp वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या नव्या फीचर पर्यायाला युजर्सची चांगलीच पसंती मिळाली. Whatsapp सारखाच हा पर्याय लवकरच फेसबुकमध्येही दिसणार आहे. फेसबुक लवकरच Facebook Messenger वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या पर्यायाचे फीचर सुरू करणार आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्सना 'डिलीट फॉर एवरीवन' हा पर्याय मिळणार आहे. सध्या फेसबुकवर या फीचरची चाचणी करण्यात येत आहे.