फेसबुकने 6 भारतीय भाषांमध्ये लाँच केली डिजिटल साक्षरता लायब्ररी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 03:54 PM2018-10-30T15:54:02+5:302018-10-30T16:17:11+5:30
फेसबुकने तीन लाख भारतीयांना डिजिटल सुरक्षेचं प्रशिक्षण देण्यासाठी डिजिटल साक्षरता लायब्ररी लाँच केली आहे.
नवी दिल्ली - फेसबुकने तीन लाख भारतीयांना डिजिटल सुरक्षेचं प्रशिक्षण देण्यासाठी डिजिटल साक्षरता लायब्ररी लाँच केली आहे. बांगला , हिंदी, तमिळ, तेलगु, कन्नड आणि मल्याळम या सहा भारतीय भाषांमध्ये लायब्ररी आहे. दक्षिण आशिया सुरक्षा संमेलनात याबाबत घोषणा करण्यात आली आहे.
भारत, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश आणि अफगाणिस्तान पाच देशांमधील 70 संघटनांनी या संमेलनात भाग घेतला होता. तसेच तज्ञांनी ऑनलाईन सुरक्षितता आणि तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांबाबत चर्चा केली. फेसबुकने याशिवाय सायबर पीस फाऊंडेशन आणि डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्या सहयोगानं दिल्ली आयआयटीमध्ये बाल सुरक्षा हॅकाथनचं आयोजन केलं आहे.
फेसबुकच्या एंटीगोन डेविस यांनी स्थानिक भागीदारांसोबत आम्ही डिजिटल साक्षरता लायब्ररी, बाल सुरक्षा हॅकाथन आणि अन्य ऑफलाईन प्रशिक्षणाचे कार्यक्रम करतो. ते कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीचा चुकाचा वापर करणाऱ्या समस्येविषयी असलेल्या आमच्या भूमिकेबाबत सांगतात असं म्हटलं आहे. तसेच डिसेंबर 2018 पर्यंत भारतातील जवळपास तीन लाख लोकांना प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचं डेविस यांनी सांगितलं.