मस्तच! एकाचवेळी 50 जणांना करा व्हिडीओ कॉल; Whatsapp web साठी आलं ‘Messenger Rooms’ फीचर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 01:04 PM2020-08-05T13:04:02+5:302020-08-05T13:07:48+5:30
व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी असे एक फीचर आणले आहे, जे आता चुकीच्या बातम्यांना आळा घालण्यास मदत करेल.
सोशल मीडिया नेटवर्किंग कंपनी फेसबुक इंक (Facebook Inc.) युजर्ससाठी आपल्या प्लॅटफॉर्मवर नव-नवीन फीचर लाँच करत आहे. यावेळी कंपनीने व्हॉट्सअॅप वेबवर (Whatsapp web) फेसबुक मेसेंजर रुम्स (Facebook Messenger rooms) फीचर आणले आहे.
या फीचरच्या माध्यमातून युजर्स आता व्हॉट्सअॅपवर एकाचवेळी 50 व्हिडीओ कॉल करू शकतील. विशेष म्हणजे, यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही, म्हणजेच युजर्स आपल्याला पाहिजे तोपर्यंत व्हिडिओ कॉल करू शकतात.
हे फीचर नुकतेच व्हॉट्सअॅप वेबवर लाँच केले आहे, म्हणजे ते फक्त डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर वापरले जाऊ शकते. तसेच, हे फीचर स्मार्टफोनवर केव्हा आणले जाईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. फेसबुक मेसेंजर रुम्स फीचर काही महिन्यांपूर्वी फेसबुक मेसेंजरवर ग्रुप व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी सुरू करण्यात आले होते.
असा करा 'या' फीचरचा वापर..
- Messenger Rooms फीचरचा वापर करण्यासाठी Whatsapp web चे लेटेस्ट व्हर्जन पाहिजे.
- रुम्स क्रिएट करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा Whatsapp ओपन करा. स्क्रीनच्या सर्वात वरती डाव्या बाजूला तीन डॉट्सवर क्लिक करा.
- असे केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल आणि हे फीचर दिसेल.
- त्यानंतर खाली दिलेल्या ‘Create a Room’ ऑप्शनवर केल्यानंतर continue in messenger वर क्विक करा. यानंतर सहज तुम्ही व्हिडीओ कॉल करू शकता.
'Search the Web' फीचर झाले लाँच...
व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी असे एक फीचर आणले आहे, जे आता चुकीच्या बातम्यांना आळा घालण्यास मदत करेल. व्हॉट्सअॅपने एक नवीन 'सर्च द वेब' (Search the Web) फीचर लाँच केले आहे, जे खास करून चुकीच्या बातमी टाळण्यासाठी आहे. व्हॉट्सअॅपच्या ब्लॉगनुसार, Search the Web नावाचे फीचर वेबवरील मेसेजसमोर सर्च बटण तयार होईल.
तुम्ही या मेसेजसोबत दिलेल्या मॅग्निफाइंग ग्लास (सर्च बटन) चिन्हावर क्लिक करू शकता, त्यानंतर तुम्ही तुमच्या फोनच्या डीफॉल्ट ब्राउझरवर रिडायरेक्ट केले जाईल, जेथे मेसेज अपलोड केला जाईल. याद्वारे, युजर्स व्हॉट्सअॅपवरून थेट वेबवर पाठविलेले मेसेजेस सर्च करू शकतील आणि हे तपासू शकतील की पाठविलेला मेसेज चुकीचा आहे की नाही.