फेसबुकने आणलं नवं फिचर! ग्रुप चॅटमध्ये आता 250 जणांना करता येणार अॅड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 10:26 AM2018-10-15T10:26:14+5:302018-10-15T10:43:01+5:30

फेसबुक हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने अनेक जण त्याचा मोठ्याप्रमाणावर वापर करत असतात.

facebook new feature allow users to chat with 250 people in group | फेसबुकने आणलं नवं फिचर! ग्रुप चॅटमध्ये आता 250 जणांना करता येणार अॅड

फेसबुकने आणलं नवं फिचर! ग्रुप चॅटमध्ये आता 250 जणांना करता येणार अॅड

Next

नवी दिल्ली - फेसबुक हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने अनेक जण त्याचा मोठ्याप्रमाणावर वापर करत असतात. मात्र आतापर्यंत मर्यादीत संख्येतच मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणं शक्य आहे. फेसबुक नेहमीच युजर्ससाठी नवीनवीन फिचर्स आणतं असतं. फेसबुक वापरणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. कारण फेसबुकच्या ग्रुप चॅटमध्ये एकाच वेळी 250 जणांना अॅड करणं आता शक्य होणार आहे. 

फेसबुकच्या या नव्या फिचरमुळे एकाच वेळी 250 जणांसोबत आता संवाद साधता येणार आहे. टेकक्रंचने याबाबतचे एक वृत्त दिले आहे. फेसबुकवर ग्रुप चॅट कोणी सुरू केल्यानंतर तुम्हाला त्याचं निमंत्रण देणार एक नोटीफिकेशन येईल. तुमची परवानगी असेल किंवा तुम्हाला चॅट करायची इच्छा असल्यास तुम्ही ते निमंत्रण स्विकारू शकता. त्यानंतर तुम्ही ग्रुप चॅटमध्ये सहभागी व्हाल. यामध्ये ऑडिओ आणि व्हिडीओच्या माध्यमातून सहभागी होता येणार आहे. यामध्ये एकाच वेळी 50 जण सहभागी होऊ शकतात. 

मेसेज रिअॅक्शनचं नोटीफिकेशन, नोटीफिकेशन ऑन ऑफ, चॅट दरम्यान मेन्शन करणाऱ्या सर्व गोष्टी ग्रुप चॅटमध्ये असणार आहे. मात्र किती जणांचा ग्रुप असावा आणि ग्रुप कधी बंद करावा हे अधिकार ग्रुप अॅडमिनकडे असणार आहेत. फेसबुकच्या ग्रुपमध्ये याआधी केवळ 150 जणांना अॅड करणं शक्य होतं. 

Web Title: facebook new feature allow users to chat with 250 people in group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.