घरबसल्या कमवा 26 लाख महिना; फेसबुकनं सादर केलं भन्नाट फिचर, देणार टिकटॉकला टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 08:08 PM2022-02-23T20:08:41+5:302022-02-23T20:09:05+5:30
फेसबुक रील्स फिचर जगभरातील सुमारे 150 देशांमध्ये लाँच करण्यात आलं आहे. या फिचरमुळे टिकटॉकला टक्कर मिळणार आहे.
Facebook Reels फिचर आता जागतिक स्थरावर 150 देशांमध्ये लाँच झालं आहे. Tiktok ला टक्कर देण्यासाठी कंपनीनं या फिचरची सुरुवात 2020 मध्ये केली होती. मेटाचे सीईओ मार्क जुकरबर्ग यांनी फेसबुक रील क्रिएटर्सना पैसे कमवण्याची संधी देणार असल्याचं म्हटलं आहे. यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्ससाठी Reels Play प्रोग्राम सुरु करण्यात आला आहे.
ज्या क्रियटर्सच्या रील्सवर 30 दिवसांमध्ये कमीत कमी 1000 व्यूज असतील अशा क्रिएटर्सना फेसबुककडून बोनस मिळेल. Reels Play बोनस प्रोग्राम कंपनीच्या 1 बिलियन डॉलर क्रिएटर्स इन्व्हेस्टमेंटमधील एक भाग आहे. या प्रोग्राममध्ये क्रिएटर्सना महिन्याला जास्तीत जास्त 35,000 डॉलर (सुमारे 2611,514) ची कमाई करता येईल.हे कमाई पात्र रिल्सच्या व्यूजवर अवलंबुन असेल.
फेसबुकवरील रिल्सवर बॅनर्स आणि स्टीकर्सच्या स्वरूपात जाहिराती दाखवण्यात येतील. या जाहिरातींमधून फेसबुकला पैसे मिळतील. या महसुलाचा एक भाग क्रिएटर्सना देण्यात येईल. क्रिएटर्सना रिल्स पोस्ट करण्यात मदत व्हावी म्हणून एडिटिंग, शेयरिंगसह व्हिडीओ रीमिक्स करण्याचा पर्याय देण्यात येईल. तसेच ड्राफ्ट ऑप्शन आणि ड्रॉफ्ट सेव्ह बटन मिळेल. फेसबुक रीलमध्ये 60 सेकंदाचे छोटे व्हिडीओ बनवता येतील.
हे देखील वाचा:
- पैसा वसूल डील! 17 हजारांत 55-इंचाचा Smart TV; शानदार 4K डिस्प्ले देईल थिएटरची मजा
- Free Internet मिळवण्याची ‘या’ सोप्प्या पद्धती माहित आहेत का? डेटा संपल्यावर येतील कामी