फेसबुकवरून करा तुमचा मोबाइल रिचार्ज, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 10:44 AM2018-04-19T10:44:31+5:302018-04-19T10:44:31+5:30

नवं फीचर सध्या फक्त एन्ड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध आहे.

Facebook Rolls out Recharge Feature: Pre-Paid Mobile Users in India Can Pay Online Via FB | फेसबुकवरून करा तुमचा मोबाइल रिचार्ज, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

फेसबुकवरून करा तुमचा मोबाइल रिचार्ज, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

Next

मुंबई- सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने भारतात एन्ड्रॉइड युजर्ससाठी एक फीचर लॉन्च केलं आहे. या फीचरचा उपयोग करुन यूजर्स आता विविध मोबाइल नेटवर्कचे प्रिपेड मोबाइल नंबर रिचार्ज करु शकतात. हे नवं फीचर सध्या फक्त प्रीपेड आणि एन्ड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध आहे. पण लवकरच आयफोन आणि डेस्कटॉप साइटवर हे फीचर उपलब्ध होणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय पोस्टपेड नंबरचं बील भरण्यासाठीही हे फीचर येऊ शकतं. 

अशा प्रकारे फेसबुकवरून करा मोबाइल नंबर रिचार्ज

- फेसबुक सुरू केल्यावर नोटिफिकेशनच्या बाजूला असणाऱ्या तीन आडव्या रेषांवर क्लिक करा. 

- तेथे मोबाइल रिचार्जचा पर्याय दिसेल. जर त्या लिस्टमध्ये पर्याय नसेल तर  'See More' वर क्लिक करा.

- त्यानंतर स्क्रीनवर येणाऱ्या मेसेजमधून  'Choose a plan and pay with your debit or credit card, its fast, secure and free' असं येइल. नंतर 'Recharge Now' वर क्लिक करा.  

- .'Mobile Recharge' स्क्रीनवर तुमचा मोबाइल नंबर टाका.

- नंबर टाकल्यावर फेसबुकला तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरबद्दल माहिती मिळेल. तुम्ही एन्ड्रॉइड मेन्यूमध्ये जाऊन त्याला बदलूही शकता. रिचार्ज करताना तुम्हाला एअरटेल, बीएसएनएल, आयडिया, जिओ, एमटीएनएल दिल्ली, एमटीएनएल मुंबई, टाटा डोकोमो, टेलिनॉर आणि वोडाफोन हे पर्याय मिळतील.

- पर्याय निवडल्यावर किती रुपयांचं रिचार्य आहे ती किंमत टाका. जर तुम्हाला प्लॅनची माहिती नसेल तर 'Browse Plans' वर टॅप करा. 

- 'Browse Plans'मध्ये तुम्हाला अनेक प्लॅन्स दिसतील. त्यापैकी तुम्हाला हवा असलेला प्लॅन निवडा. 

- नंतर  'Review Order' वर क्लिक करा. 

- त्यानंतर डेबिट/क्रेडिट कार्डाची माहिती द्या. व .'Place Order' वर टॅप करा.  

- वन टाइम पासवर्ड विचारला जाईल. तो एन्टर केल्यावर रिचार्ज पूर्ण होईल. 

Web Title: Facebook Rolls out Recharge Feature: Pre-Paid Mobile Users in India Can Pay Online Via FB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.