Apple Watch ला टक्कर देणार Facebook चा स्मार्टवॉच; MetaWatch नावाने होऊ शकतो लाँच
By सिद्धेश जाधव | Published: October 29, 2021 03:43 PM2021-10-29T15:43:03+5:302021-10-29T15:43:21+5:30
Facebook Smaratwatch: Facebook अर्थात Meta कंपनी आता हार्डवेयर सेगमेंटमध्ये Smartwatch सादर करू शकते. ज्याची डिजाइन Apple Watch सारखी असू शकते.
Facebook ने आपल्या पॅरेंट कंपनीचे नाव बदलून Meta ठेवले आहे आणि ही नवीन कंपनी नव्या मार्गावर चालू शकते असे संकेतही कंपनीने दिले आहेत. मेटा हार्डवेयर सेगमेंटमध्ये जास्त सक्रिय होणार असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकने स्मार्ट ग्लासेस सादर केले होते. तर आता कंपनीचा Smartwatch बाजारात येणार असल्याची बातमी आली आहे.
मेटाने या स्मार्टवॉचची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु आज एका नवीन लीक मधून Metawatch ची माहिती समोर आली आहे. लीकमध्ये कंपनीचा आगामी स्मार्टवॉच Apple Watch च्या डिजाइन प्रमाणे असलेल्या डिजाईनसह सादर केला जाईल, असे समजले आहे. तसेच हा स्मार्टवॉच 2022 च्या सुरुवातीला ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.
Facebook Smartwatch
प्रसिद्ध लिक्स्टर Mark Gurman यांनी ब्लूमबर्गला आगामी फेसबुक स्मार्टवॉचची माहिती दिली आहे. सोबत एक लीक रेंडरचा देखील समावेश आहे. या स्मार्टवॉचचे कोडनेम Milan असेल, असे लीक झालेल्या कोडमधून समजले आहे. तसेच या वॉचचा लूक Apple Watch सारखा असेल. फक्त फेसबुक आपल्या स्मार्टवॉचमध्ये कॅमेऱ्याचा समावेश करू शकते. हा कॅमेरा एका वॉटरड्रॉप नॉचमध्ये फिट करण्यात येईल. ही नॉच डिस्प्लेच्या तळाला असेल.
या कॅमेऱ्याच्या मदतीने फोटो कॅप्चर करता येतील, तसेच व्हिडीओ देखील शूट करता येतील. आणि ज्याप्रमाणे फेसबुक स्मार्ट ग्लासेस प्रमाणे या मीडिया फाईल्स थेट फेसबुकवर शेयर करण्याचा पर्याय देखील मिळू शकतो. या वॉचच्या उजव्या बाजूला एक बटन असेल, ज्याच्या मदतीने हा डिवाइस कंट्रोल करता येईल.