आठवड्याभरात दुसऱ्यांदा Facebook, Instagram डाऊन; कंपनीनं मागितली माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 08:58 AM2021-10-09T08:58:20+5:302021-10-09T08:59:47+5:30

Facebook, Instagram Down : Social Media App इन्स्टाग्राम आणि फेसबुक आठवड्याभरात दुसऱ्यांदा डाऊन झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर कंपनीनं युझर्सची मागितली माफी.

Facebook says outage affecting Instagram Messenger, and more has been fixed | आठवड्याभरात दुसऱ्यांदा Facebook, Instagram डाऊन; कंपनीनं मागितली माफी

आठवड्याभरात दुसऱ्यांदा Facebook, Instagram डाऊन; कंपनीनं मागितली माफी

googlenewsNext
ठळक मुद्दे Social Media App इन्स्टाग्राम आणि फेसबुक आठवड्याभरात दुसऱ्यांदा डाऊन झाल्याचं पाहायला मिळालं.

सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्राम (Instagram) आणि फेसबुकची (Facebook) सेवा आठवड्यात दुसऱ्यांदा डाऊन झाल्याचं दिसून आलं. सेवा डाऊन झाल्यानं अनेक युझर्सना समस्यांचा सामना करावा लागला. रात्री १२ वाजल्यापासून तब्बल एका तासासाठी ही दोन्ही अॅप्स डाऊन होती. सध्या ही सेवा पूर्ववत झाली आहे. यापूर्वी सोमवारी पहाटे तब्बल सहा तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप (Whatsapp) या तिन्ही सेवा ठप्प झाल्या होत्या.

दरम्यान, सेवांचा वापर करताना पुन्हा समस्या निर्माण झाल्यानंतर फेसबुककडून माफी मागण्यात आली आहे. काही युझर्सना अॅपचा वापर करण्यास समस्या निर्माण होत आहेत. जर तुम्ही आमच्या सेवांचा लाभ घेऊ शकत नसाल तर आम्हाला खेद आहे. एकमेकांसह संवाद साधण्यासाठी आमच्यावर तुम्ही किती अवलंबून आहात हे आम्ही जाणतो. आम्ही आता समस्येचं निराकरण केलं आहे. पेशन्स ठेवल्याबद्दल धन्यवाद, असं फेसबुकनं म्हटलं आहे.



तर दुसरीकडे इन्स्टाग्रामनंदेखील युझर्सची माफी मागितली आहे. तुम्हाला इन्स्टाग्रामचा वापर करण्यास काही समस्या निर्माण होत असतील. त्याबद्दल आम्हाला खेद आहे. आता समस्याचं निराकरण करण्यात आलं आहे. आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद, असं इन्स्टाग्रामनं ट्विटरवरून म्हटलं. यापूर्वीही या तिन्ही सेवा जेव्हा ठप्प झाल्या होत्या त्यावेळी युझर्सना आणि फेसबुकला मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं.

Web Title: Facebook says outage affecting Instagram Messenger, and more has been fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.