Facebook अकाऊंट दुसरं कोणी लॉग इन करेल याची भीती वाटते?; 'हे' फीचर करणार अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 03:59 PM2019-03-28T15:59:58+5:302019-03-28T16:24:24+5:30

फेसबुकमध्ये एक असं फीचर आहे ज्याच्या मदतीने युजर्सना अकाऊंट सुरक्षित ठेवण्यास मदत होते. Facebook च्या सेटिंग में Extra Security देण्यासाठी युजर्सना एक फीचर देण्यात आले आहे.

facebook security alert how to get alert unauthorised login notification on facebook | Facebook अकाऊंट दुसरं कोणी लॉग इन करेल याची भीती वाटते?; 'हे' फीचर करणार अलर्ट

Facebook अकाऊंट दुसरं कोणी लॉग इन करेल याची भीती वाटते?; 'हे' फीचर करणार अलर्ट

नवी दिल्ली - फेसबुक युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. फेसबुक काही वेळा चुकून लॉग इन राहीलं तर अनेकदा त्याचा चुकाचा वापर केला जाण्याची शक्यता ही अधिक असते. मात्र फेसबुकमध्ये एक असं फीचर आहे ज्याच्या मदतीने युजर्स अकाऊंट सुरक्षित ठेवू शकतात. Facebook च्या सेटिंग में Extra Security देण्यासाठी युजर्सना एक फीचर देण्यात आले आहे. या फीचरबाबत जाणून घेऊया. 

-  फेसबुकने दिलेले हे फीचर अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी सर्वप्रथम आपलं फेसबुक अकाउंट ओपन करा. 

- ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करा. 

- क्लिक केल्यानंतर सेटींगचा एक पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यास एक नवं पेज ओपन होईल. 

- मल्टीपल ऑप्शन त्यामध्ये देण्यात आलेले असतील. त्यातील  Security & Login वर जा.

- थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर ‘Setting Up Extra Security’ चा एक पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा. 

-  ‘Get Alerts about unrecognized logins’ हा पर्याय दिसेल. तसेच त्याच्यासमोर Edit चे बटण असणार आहे. 

- पर्यायावर क्लिक केल्यानंतर तेथे ‘Notification’, ‘Messenger’ आणि ‘Email’ हे तीन पर्याय दिसतील. 

- तिन्ही पर्यायासमोर ‘Get Notifiation’ आणि ‘Don’t Get Notifiation’ असे आणखी दोन पर्याय दिसतील.  

- यामध्ये युजर्सना  ‘Get Notifiation’ वर टिक करून Enable करावं लागेल. त्यानंतर Save Changes वर क्लिक करा.

फेसबुक संदर्भातील ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीने तुमचं फेसबुक अकाऊंट लॉग इन केलं तर तुम्हाला त्याबाबत अलर्ट दिला जाईल.  

Facebook वर आता आवडीच्या गाण्यासोबत पोस्ट करता येणार 

गाणी ऐकायला अनेकांना आवडतं. काही वेळा आवडीची गाणी सोशल मीडियावर शेअर करून पोस्ट करण्याची इच्छा असते. मात्र प्रत्येक वेळी हे शक्य होतं असं नाही. फेसबुक लवकरच आपल्या युजर्सना अशा पद्धतीची सुविधा देणार आहे. फेसबुक युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. या सुविधेसाठी फेसबुकने काही भारतीय संगीत कंपनीशी करार केला आहे. कंपनीने टी-सीरीज म्यूझिक, झी म्यूझिक आणि यश राज फिल्म्ससह काही कंपनींसह करार केला आहे. फेसबुकच्या या नव्या फीचरमुळे युजर्सना आपल्या पोस्ट आणि व्हिडीओसोबत गाणं शेअर करण्याची सुविधा मिळणार आहे.

गेमिंग लव्हर्ससाठी खूशखबर, फेसबुकने लाँच केला Gaming Tab

फेसबुकने यावेळी गेमिंग लव्हर्स युजर्ससाठी एक Gaming Tab लाँच केला आहे. फेसबुकच्या मेन नेविगेशन पेजवर युजर्सना आता एक वेगळं सेक्शन दिसणार आहे. यामुळे युजर्स गेमिंग पेजवर थेट जाऊ शकणार आहेत. गेमिंग पेजवर युजर्सना अनेक इंटरेस्टिंग गेमचे ऑप्शन देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे गेम्स युजर्सना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळता येणार आहेत.  Gaming Tab वर युजर्सना गेम्सचे लोकप्रिय ग्रुप्स फॉलो करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच या नव्या टॅबमध्ये युजर्स आपल्या आवडीने गेम्स निवडून अनेक नवीन कॉन्टॅक्ट शोधू शकतात. रिपोर्टनुसार, युजर्सना या टॅबमध्ये टॉप स्टीमर्स आणि गेम पब्लिशर्सचे व्हिडीओ तसेच इतर गेमिंग गुप्सबाबत अपडेट दिसणार आहेत. सर्व लोकांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी एक वेगळा गेमिंग टॅब लाँच केलं आहे. जगभरात जवळरपास 700 मिलियन म्हणजेच 70 कोटी युजर्स रोज व्हिडीओ गेम खेळतात असा दावा कंपनीने केला आहे. 

फेसबुकवरून व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टालाही मॅसेज पाठविता येणार...

गुगलच्या ऑर्कुटसारखी फेसबुकची स्थिती होऊ नये म्हणून फेसबुक कंपनी नवनवीन फीचर आणत असतं. आता फेसबुकवरून इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवरही मॅसेज पाठविता येणार आहेत. ही सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवरूनही फेसबुकला मॅसेज पाठविण्यासाठी मिळणार आहे. खरंतर फेसबुक त्याच्या मालकीच्या या तिन्ही प्लॅटफॉर्मला एकमेकांना जोडण्याची तयारी करत आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार ही कल्पना मार्क झुकरबर्ग यांना सुचली आहे. या तिन्ही प्लॅटफॉर्मच्या अ‍ॅपचा वापर बदलणार नसून केवळ एकमेकांना क्रॉस प्लॅटफॉर्मवर मॅसेज पाठविता येणार आहेत. 

Facebook वर लवकरच येणार Whatsapp सारखं फीचर

Facebook आणि Whatsapp नेहमीच युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतात. Whatsapp वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या नव्या फीचर पर्यायाला युजर्सची चांगलीच पसंती मिळाली. Whatsapp सारखाच हा पर्याय लवकरच फेसबुकमध्येही दिसणार आहे. फेसबुक लवकरच Facebook Messenger वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या पर्यायाचे फीचर सुरू करणार आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्सना 'डिलीट फॉर एवरीवन' हा पर्याय मिळणार आहे. सध्या फेसबुकवर या फीचरची चाचणी करण्यात येत आहे. 

 

 

Web Title: facebook security alert how to get alert unauthorised login notification on facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.