Facebook ने फेशियल रेकग्निशन बंद करण्याचा घेतला मोठा निर्णय; 100 कोटी युजर्सवर होणार परिणाम 

By सिद्धेश जाधव | Published: November 4, 2021 05:24 PM2021-11-04T17:24:09+5:302021-11-04T17:24:23+5:30

Facebook Automatic Face Tagging Feature: Facebook ने ऑटोमॅटिक फेस टॅगिंग फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फोटोमधील व्यक्ती ओळखून टॅग करण्याचा पर्याय आता मिळणार नाही.  

Facebook to shut down automatic face tagging feature in coming weeks  | Facebook ने फेशियल रेकग्निशन बंद करण्याचा घेतला मोठा निर्णय; 100 कोटी युजर्सवर होणार परिणाम 

Facebook ने फेशियल रेकग्निशन बंद करण्याचा घेतला मोठा निर्णय; 100 कोटी युजर्सवर होणार परिणाम 

Next

फेसबुकने काही दिवसांपूर्वी आपल्या होल्डिंग कंपनीचे नाव फेसबुकवरूनमेटा’ असे ठेवले होते. तेव्हापासून कंपनीची दिशा बदलत असल्याचे दिसत आहे. कंपनी स्मार्ट ग्लासेस आणि स्मार्टवॉच देखील लाँच करणार आहे. तर आता Facebook ने आपले जुने ऑटोमॅटिक फेस टॅगिंग फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  

या फिचरसाठी फेशियल रेकग्निशनचा वापर करून अपलोड केलेल्या फोटो मधील व्यक्तींचे फेसबुक अकॉउंट शोधले जाते. त्यामुळे त्या फोटोमध्ये त्या व्यक्तीला टॅग करणे सोप्पे होते. हे फीचर बंद झाल्यावर युजरला अकॉउंटमधून ऑटो फेस टॅगिंगचा ऑप्शन निवडता येणार नाही. फोटोमधील मित्रांना टॅग करण्यासाठी युजरला आता मॅन्युअली टॅगिंग करावी लागेल.  

100 कोटी लोकांचा डेटा होणार डिलीट 

इतकेच नव्हे तर, फेसबुकने आपल्या डेटाबेसमधून 100 कोटी लोकांच्या चेहऱ्यांचा डेटा देखील डिलीट करेल. कंपनीने या फिचरचा सकारात्मक वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर विशेष नजर ठेवली जात आहे आणि रेग्युलेटर यासाठी नियम देखील ठरवणार आहेत. फेसबुकचा हा बदल आतापर्यंतच्या सर्वात मोठा बदल म्हणता येईल.  

Facebook वरील एक तृतीयांश पेक्षा जास्त सक्रिय युजर्स या ऑटोमॅटिक फेस रेकग्निशन फीचरचा वापर करतात. हे फीचर बंद केल्यामुळे 100 कोटी फेसबुक युजर्सच्या चेहऱ्यांची ओळख डिलीट केली जाईल. गेल्या काही दिवसांपासून युजर्सना फोटोमध्ये मॅन्युअली टॅग करावे लागत आहे. या फिचरमुळे नेत्रहीन लोक फोटोमधील लोकांची माहिती ऑटोमॅटिक ऑल्ट टेक्स्ट सारख्या फिचरमधून मिळवत होते. परंतु आता या फीचरमध्ये लोकांची नावे येणार नाहीत.  

Web Title: Facebook to shut down automatic face tagging feature in coming weeks 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.