'फेसबुक'वर तशा कमेन्ट्स करणा-यांचं आता काही खरं नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 06:07 PM2018-02-09T18:07:46+5:302018-02-09T18:08:09+5:30

'डिस्लाइक'चा पर्याय आणणार नाही, असे फेसबुकनं वेळोवेळी स्पष्ट केले आहे. 'डिस्लाइक'च्या ऑप्शनमुळे ऑनलाइन दादागिरीला प्रोत्साहन मिळेल, अशी भीती कंपनीकडून व्यक्त करण्यात आली आहे.

facebook is testing a downvote button heres what it means | 'फेसबुक'वर तशा कमेन्ट्स करणा-यांचं आता काही खरं नाही

'फेसबुक'वर तशा कमेन्ट्स करणा-यांचं आता काही खरं नाही

नवी दिल्ली - 'डिस्लाइक'चा पर्याय आणणार नाही, असे फेसबुकनं वेळोवेळी स्पष्ट केले आहे. 'डिस्लाइक'च्या ऑप्शनमुळे ऑनलाइन दादागिरीला प्रोत्साहन मिळेल, अशी भीती कंपनीकडून व्यक्त करण्यात आली आहे. याच कारणामुळे फेसबुक 'डिस्लाइक'चे ऑप्शन देऊ इच्छित नाही. डिस्लाइक ऑप्शन देऊ शकत नसल्याने आता कंपनी साईटवर डिस्लाइक ऑप्शनऐवजी असंच काहीसे मिळतेजुळते ऑप्शन देण्याची शक्यता आहे. सध्या फेसबुककडून 'Downvote' या पर्यायावर चाचणी करण्यात येत आहे. फेसबुकचे हे नवीन फीचर अमेरिकेमध्ये टेस्ट करण्यात येत आहे. येथे लोकं पब्लिक पेजवरील पोस्टवरील प्रतिक्रियांसाठी रिअॅक्ट करण्यासाठी 'Downvote'चे ऑप्शन सिलेक्ट करत आहेत. 

टेकक्रन्चच्या रिपोर्टनुसार, अनुचित, असभ्य आणि भ्रम पसरवणा-या प्रतिक्रियासंदर्भात सावध करण्याचं काम फेसबुकचं हे नवीन फीचर करणार आहे. फेसबुकसोबत झालेल्या खास बातचितदरम्यान कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, ''आमच्याकडून डिस्लाइक ऑप्शनची चाचणी केली जात नाहीय.  आम्ही युजर्ससाठी अशा एका नवीन फीचरची चाचणी करत आहोत, ज्यामध्ये पब्लिक पेज पोस्ट्सवर येणा-या कमेन्ट्सवर युजर्सं आपली प्रतिक्रिया देऊ शकतील''. 

'Downvote' ऑप्शनसाठी अन्य कोणतेही आयकन देण्यात येणार नाहीय. प्रत्येक कमेन्टच्या खालील बाजूस म्हणजे LIKE, REPLY च्या शेजारी 'Downvote'    'Downvote' हे नवीन फीचर असेल. पण येथे एक ट्विस्ट आहे. एखाद्या युजर्सनं 'Downvote' या ऑप्शनवर क्लिक केल्यास, सर्वात आधी फेसबुककडून या मागील कारण विचारण्यात येईल. यामध्ये आक्षेपार्ह, दिशा भूल करणारे असं काही आहे, याबाबतची विचारणा फेसबुककडून करण्यात येईल.  

दरम्यान,  मर्यादित कालावधीपर्यंतच नवीन फीचरची टेस्ट करण्यात येत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आले आहे. शिवाय, कोणत्याही पोस्टच्या रँकिंगवर 'Downvote' ऑप्शनचा कोणताही परिणाम होणार नाही. कोणत्या पोस्टवर किती वेळा 'Downvote' करण्यात आले आहे, हे फेसबुक, फेसबुक डाऊनवोट, फेसबुक, फेसबुक युजर्स पाहू शकणार नाहीत.
 

Web Title: facebook is testing a downvote button heres what it means

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.