काय सांगता? फेसबुकसाठी 'हे' काम केल्यानंतर तब्बल ७७ लाख मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 03:07 PM2020-05-14T15:07:30+5:302020-05-14T15:13:38+5:30

जिंकणाऱ्या स्पर्धकाला १०० हजार डॉलर म्हणजेच ७७ लाख दिले जाणार आहेत. 

Facebook will give rs77 lakh if you will build for detecting hate memes myb | काय सांगता? फेसबुकसाठी 'हे' काम केल्यानंतर तब्बल ७७ लाख मिळणार

काय सांगता? फेसबुकसाठी 'हे' काम केल्यानंतर तब्बल ७७ लाख मिळणार

Next

सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यातं आलं आहे. त्यामुळे  जास्तीत जास्त वेळ लोक सोशल मीडियावर घालवताना दिसून येत आहेत. सध्याच्या जनरेशनसाठी लॉकडाऊन असो किंवा नसो मोबाईलच्या मागे दिवसभर असतात.  टिकटॉक, भन्नाट मीम्स, फेसबुक आणि  इंस्टाग्रामवर धुमाकुळ घातलेला असतो. पण सध्या लॉकडाऊनमुळे  जग थांबल्यासारखे वाटू लागले आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत  वादग्रस्त आणि खळबळजनक मीम्स सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार फेसबुकद्वारे सोशल मीडियावरील वादग्रस्त व्हिडीओंवर नियंत्रण ठेवलं जातं. सध्या फेसबुकद्वारे आर्टिफिशियल इंटेलेजंस सिस्टिम विकसित करण्यात आली आहे. याद्वारे वादग्रस्त आणि सोशल मीडीयावर असंतोष पसरवत असलेल्या फोटोंना सुद्धा रोखलं जाऊ शकतं. पण मीम्स मात्र रोखता येऊ शकत नाही. म्हणून मीम्स रोखण्यासाठी जगभरातील डेवलपर्ससाठी एका स्पर्धेचं आयोजन केलं आहे. यात जिंकणाऱ्या स्पर्धकाला १०० हजार डॉलर म्हणजेच ७७ लाख दिले जाणार आहेत. 

या स्पर्धेसाठी  रिसर्च करत असलेल्यांना माहिती देण्यासाठी फेसबुकचं मीम्स डेटाबेस आहे. टूल्सद्वावरे वेगवेगळ्या फोटोजचं वर्गीकरण केलं जाईल. म्हणजे आर्टिफिशयल इंटेलेजंस सिस्टिमद्वारे कोणते मीम्स वादग्रस्त किंवा दहशत पसरवणारे आहेत याची माहिती घेतली जाईल. मिम्सना डिटेक्ट करण्याचं काम या सिस्टिमच्या माध्यामातून करण्यात येईल.

DrivenData टीमसोबत हे आव्हान  फेसबुकमार्फत देण्यात आलं आहे.  या स्पर्धेत माहिती संशोधकांना सहभागी  होता येणार आहे.  ज्या संशोधकांची टीम अशा प्रकारच्या मीम्सचे कोड क्रॅक करेल त्यांना ७७ लाखांच बक्षिस देण्यात येईल. सहभागी  होण्यासाठी येथे क्लिक करा. 

("कर्मचाऱ्यांनी इच्छा असेल तर ऑफिसला यावे अन्यथा कायम घरातून काम करावे")

(शाओमीचे सीईओ कोणता फोन वापरतात माहित्येय?; नेटकऱ्यांनी एका पोस्टमधून काढलं शोधून)

Web Title: Facebook will give rs77 lakh if you will build for detecting hate memes myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.